Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाणे इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. महाराष्ट्राच्या संस्कृतीत उखाण्याला विशेष महत्त्व आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीराचे नाव घेणे, यालाच आपण उखाणा म्हणतो.सध्या असाच एक उखाणा व्हायरल होत आहे. हा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हिडीओ एका घरघुती कार्यक्रमातील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका विवाहित तरुणीला तिच्या आजुबाजूला असलेली लोकं उखाणा घेण्यास विचारते तेव्हा ही तरुणी लाजते आणि उखाणा घेते. उखाणा घेताना ती म्हणते, “कृष्णा नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी, विशालरावांबरोबर आहे मी सुखी सासरी” उखाणा ऐकून सर्व टाळ्या वाजवताना दिसतात.

हेही वाचा : VIDEO : सीताफळाच्या बिया सोप्या पद्धतीने कशा काढाव्यात? पाहा सोपी ट्रिक, व्हिडीओ होतोय व्हायरल

gaonkararchana या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वहिनीचा उखाणा” या उखाण्यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान वहिनी” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर उखाणा”