Ukhana Viral Video : उखाणा हा आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, याला आपण उखाणा म्हणतो. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेतात. सध्या लग्नसमारंभ सुरू आहे, त्यामुळे लग्नातील एक प्रमुख प्रथा म्हणून नवरदेव नवरीला उखाणा विचारला जातो. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही उखाणे मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही उखाणे ऐकून पोट धरून हसायला येते तर काही उखाणे ऐकून मन भावुक होते. पण तुम्ही कधी असा उखाणा ऐकला की ऐकून तोंडाला पाणी सुटले? हो, एका महिलेने एक भन्नाट उखाणा घेतला आहे. त्यात तिने खाद्य पदार्थांची नावे घेतली आहे. हा उखाणा ऐकून कोणीही थक्क होईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल तिने नऊवारी नेसली आहे आणि मराठी साज श्रृंगार केला आहे. कपाळावक टिकली, नाकात नथ आणि केसांमध्ये गजरा माळला आहे. तिने हातात माइक धरला असून ती उखाणा म्हणताना दिसतेय.
महिला उखाणा घेताना म्हणते,
“वरण केलं पुरण केलं, केला मसाले भात,
चटणी, कोशिंबीर, रायतं, पापड, भाज्या केल्या सात;
आमटी केली, कढी केली खीर केली गोड गोड,
वरण भात साजूक तूप त्यावर लिंबाची फोड;
सारं केल वाया गेलं,
डोळ्यात आलं पाणी
पण दर्शन राव म्हणाले,
पूर्वा जेवायला वाढ ना ग राणी..”
या महिलेने तिच्या उखाण्यात एवढ्या खाद्यपदार्थांची नावे घेतली आहे की उखाणा ऐकून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. आजवर तुम्ही अनेक हटके उखाणे ऐकले असेल पण असा उखाणा कदाचित पहिल्यांदाच ऐकत असाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

assalmarathi_ukhane या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लग्नानंतर नवीन मुलगी जेव्हा सासरच्या घरी जाते तेव्हा तिला उखाणे बोलावले लागतात. त्यासाठी तुम्ही या उखाण्यांचा उपयोग करु शकता.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त उखाणा घेतला” तर एका युजरने लिहिलेय, “उखाणा होता की मेजवाणी” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.