जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता धावपटू उसेन बोल्ट आणि त्याची पार्टनर केसी बेनेट यांनी रविवारी जुळ्या मुलांच्या जन्माची माहिती जाहीर केली. विशेष म्हणजे या पैकी एका मुलाचं नावं थंडर बोल्ट असून दुसऱ्याचं नाव सेंट लिओ बोल्ट असं ठेवण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोल्टने सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील घोषणा केली. फादर्स डे निमित्त फॅमेली फोटो पोस्ट करत त्याने आपल्या मुलांच्या नावाची घोषणा केली. बोल्टने पोस्टमध्ये विजांचे इमोन्जी वापरत मुलांच्या नावाची घोषणा केली असली तरी त्यांचा जन्म कधी झालाय याची माहिती दिली नाही.

बोल्टची पार्टनर केसीनेही फोटो शेअर केला असून या फोटोंमध्ये दोन जुळ्या मुलांबरोबरच या दोघांची मुलगी ऑलम्पिया लायटनिंग बोल्टही दिसत आहे. केसीने या फोटोला कॅप्शन देताना, “माझ्या फॉरएव्हर प्रेमाला फादर्स डेच्या शुभेच्छा. उसेन बोल्ट तू या कुटुंबाचा आधार आहे आणि आपल्या मुलासाठी सर्वोत्तम वडील आहे. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असं म्हटलंय.

ऑलम्पियाचा जन्म २०२० साली झाला आहे. मात्र तिच्या नावाची घोषणाही तिच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी करण्यात आलेली. आता पुन्हा एकदा उसेन बोल्टने आपल्या मुलांची नावं ठेवताना विजेशी त्याचा संदर्भ असेल याची काळजी घेतल्याने नेटकऱ्यांनी या नावांबद्दल अनेक प्रतिक्रिया नोंदवल्यात.

१) घरात वादळी वातावरणाची शक्यता

२) या मुलांना नाव सार्थकी लावावं लागणार

३) एकाचं नाव का असं

४) म्हणून अशी नावं ठेवली

३४ वर्षीय बोल्टने ऑलिम्पिक २००८, २०१२ आणि २०१६ मध्ये तब्बल आठ सुर्वण पदकांची कमाई केली. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बोल्ट सहभागी होणार नाहीय. बोल्टने २०१७ साली निवृत्तीची घोषणा केलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usain bolt has twin boys their names take social media by storm scsg