शहरातील भटक्या कुत्र्यांना हटवण्यासाठी भोपाळ महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. भोपाळच्या बहुतांश भागात भटक्या कुत्र्यांची भीती आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलीवर पाच कुत्र्यांनी हल्ला केला. यादरम्यान मुलीला अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

हा व्हिडीओ बागसेवानिया येथील अंजली विहार फेज-१ कॉलनीचा आहे. येथे दामोह येथील रहिवासी असलेले एक कुटुंब बांधकाम सुरू असलेल्या घरात मजुरीचे काम करते. शनिवारी सायंकाळी घरापासून काही अंतरावर मजुराची मुलगी एकटीच खेळत होती. तेवढ्यात कुत्र्यांचा कळप त्याच्या जवळ आला. यादरम्यान कुत्र्यांनी मुलीला घेरले आणि तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत.

(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)

स्थानिकांनी केली मदत

स्थानिक लोकांची नजर कुत्र्यांवर पडताच त्यांना दगडफेक करून हुसकावून लावले. तोपर्यंत कुत्र्यांनी मुलीला रक्तबंबाळ केले होते. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जेपी रुग्णालयात नेले. येथून त्यांना चांगल्या उपचारासाठी हमीदिया रुग्णालयात पाठवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

(हे ही वाचा: शेळीने दिला मानवासारख्या मुलाला जन्म! सोशल मीडियावर फोटो Viral)

(हे ही वाचा: थुंकून तंदूरमध्ये रोटी बनवणाऱ्याचा Video Viral; नेटीझन्सने केला संताप व्यक्त!)

भटक्या कुत्र्यांची दहशत

विशेष म्हणजे भोपाळमधील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. काही वर्षांपूर्वी अवधपुरी भागात भटक्या कुत्र्यांनी अशाच प्रकारे एका बालकाचा बळी घेतला होता. यानंतर महापालिकेच्या वतीने शहरात धडक मोहीम राबविण्यात आली. पण त्याचे परिणाम आजही तसेच आहेत. अशा स्थितीत महापालिकेच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच भोपाळच्या जनतेची भटक्या कुत्र्यांपासून सुटका कधी होणार.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video a girl playing on the street was surrounded by five dogs and shocking incident captured on cctv ttg