Viral Video : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले आहेत.सध्या असच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पुणेकर तरुण सर्व मुलींना लाखमोलाचा संदेश देताना दिसतो.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा तरुण रस्त्याने जात असलेल्या एका मुलीला थांबवतो आणि तिच्याशी संवाद साधतो.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे पुढील संवाद खालील प्रमाणे –

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुण – Excuse me ताई, मला स्वारगेटला जायचं होतं, कसं जायचं?
तरुणी – इथुन पुढे सरळ जा
तरुण- इथून का?
तरुणी – पाच मिनिटावरती राइट घ्यायचं
तरुण – ओके
तरुणी – तिथून राइट मारला ना तर तिथेच आपला स्वारगेटचा डेपो दिसणार.
तरुण- अच्छा तिथेच आहे का?
तरुणी – हा तिथेच आहे.
तरुण – खूप लांब नाही ना?
तरुणी – नाही नाही दहा पंधरा मिनिटं लागतील फक्त
तरुण – तुम्ही पण तिकडे चाललाय का?
तरुणी – हो माझं थोडंस काम आहे. इथेच जवळपास
तरुण – अच्छा नाही, माझी कार होती, आपण गेलो असतो सोबत
तरुणी – नाही नाही, ठीक आहे
तरुण – माझी कार होती. मी सोडलं असतं, आपण गेलो असतो ताई. म्हणजे कसं तुम्ही पण माझी मदत केली त्यामुळे म्हटलं मी पण तुमची मदत करतो जाऊ बरोबर काममध्ये
तरुणी – ठीक आहे चला.
तरुण – आ?
तरुणी – ठीक आहे चालेल येते सोबत
तरुण – येताय ना?
तरुणी – हो येतेय
क्षणभरानंतर..
तरुण – काल जो प्रकार घडला, तुम्हाला माहितीये का? तुम्ही बातमी पाहिली आहे का?
तरुणी – हो , हो बघितली आहे मी
तरुण – हा मग एवढा प्रकार घडून सुद्धा आता दोन मिनिटे झाले मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही माझ्या कारमध्ये यायला तयार झाला. म्हणजे काय आहे, काल जर त्या मुलीने जर त्या माणसावर विश्वास ठेवला नसता तर ती घटना घडली नसती ना. हेच आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांना सांगायचं होतं मुलींना खासकरून सांगायचं होतं या व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही एक व्हिडीओ बनवतोय. प्रँक माझा चॅनेलचं नाव आहे की तु्म्ही असं कोणावरही विश्वास ठेवू नका.

पुढे तरुण म्हणतो, “मित्रांनो मैत्रीणींनो आणि माझ्या बहिणींनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही असे कुठलेही प्रकार घडत असेल त्याला विरोध कराच पण ज्या मुली बाहेरगावरून पुण्यात शिकायला येतात किंवा स्वतंत्र एकट्या राहतात, त्यांनी कृपया काळजी घ्या.”
या तरुणाने हा व्हिडीओ मुलींपर्यंत चांगला संदेश पोहचवण्यासाठी बनवला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. जवळपास ९ लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

prank_maza या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काल स्वारगेटला एक निंदनीय घटना घडली, ज्यामुळे मुलींना कोणावर विश्वास ठेवावा हेच कळेनासं झालं. अशा घटनांमधून शिकून सावध राहणं गरजेचं आहे. मुलींनी अधिक सतर्क राहावं, यासाठी आम्ही या व्हिडीओद्वारे एक महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काही काही मुली खूप भोळ्या असतात कोणीही फसवणुक करतात हा व्हिडिओ खरच खूप छान आहे मुलींनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा” तर एका युजरने लिहिलेय, “खरच आजचा व्हिडीओ मुलींना जागरूक करण्यासाठी खूपच छान होता दादा” आणखी एका युजरने लिहिलेय, “विषय खूप गंभीर आहे मुलींनी कोणावर पण विश्वास ठेवू नये,तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवला दादा” अनेक युजर्सना या तरुणाचे कौतुक केले आहे. खूप छान व्हिडीओ बनवला, असे लिहिलेय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video a punekar young boy made a video and appeal girls not to believe on anyone after pune swargate bus depo rape case ndj