School Days Video : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा असतो. शाळेचे दिवस, मित्रमैत्रीणी, शिक्षक, वर्गखोल्या, गमतीजमती कायम स्मरणात राहतात. शाळेचे दिवस कधीही परत येत नाही, असं म्हणतात ते खरंय. एकदा शाळेतून बाहेर पडलो की शाळेचे खरे महत्त्व कळते. शाळेच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर शाळेच्या जुने दिवस पुन्हा आठवतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही मित्र १९ वर्षानंतर शाळेत जमले आणि त्यांचा आवडता खेळ खो खो खेळले. १९ वर्षांनी पुन्हा त्याच शाळेत जाऊन खो खो खेळणाऱ्या या मित्र मैत्रीणींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तिशीत किंवा चाळिशीत असलेले पुरुष महिला दिसतील. हे शाळेतील मित्र मैत्रीण आहेत आणि ते त्यांच्या शाळेत आलेले आहेत आणि चक्क १९ वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत खो खो खेळत आहे. खेळताना त्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसतोय. जुने दिवस परत आले, असे तुम्हाला या व्हिडीओत दिसून येईल. ते खूप मनसोक्तपणे आणि आनंद घेऊन खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवेल तर काहींना शाळेतील मित्र मैत्रीणी आठवेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sudesh_kate91 नावाच्या युजरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “१९ वर्षांनी त्याच शाळेमध्ये खेळलो मित्र मैत्रिणी बरोबर खो खो. खूप भारी वाटलं, जुने दिवस आठवले.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” मस्तच मला शाळेतील दिवस आठवले…मी पण खो खो… कबड्डी खेळली आहे शाळेत…. आणि ते दिवस खरच भारी होते” तर एका युजरने लिहिलेय, “… शब्दात न मावणारा आनंद” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह मस्त असेच आनंदी जीवन जगा” एक युजर लिहितो, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…खूप छान एन्जॉय केला सर्वांनी..पुन्हा एकदा तुमचा व्हिडिओ बघून मला पण माझ्या शाळेची आठवण झाली” तर एक युजर लिहितो, “खुप मस्त सगळे मित्र मैत्रीणी भेटल्यावर जो आनंद आहे तो कशातच नाही, आम्ही पण दर वर्षी गेट टुगेदर करतो, खूप भारी दिवस जातो..” अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांचे शाळेचे दिवस आठवले आहेत.