Anand Mahindra Viral Video: महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात. व्हायरल व्हिडीओ शेअर करून महिंद्रा नेहमीच आपल्या हटके कल्पना शेअर करत असतात. आता सुद्धा महिंद्रांनी एका साऊथ इंडियन हॉटेलमधील वेटरचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शेफ त्या माणसाच्या हातात गरम डोश्याच्या प्लेट्स देत जातो. एक नाही, दोन नाही तर चक्क १६ प्लेट्स एकाच हातात उचलून हा वेटर ज्या आत्मविश्वासाने व सराईतपणे चालू लागतो ते बघून महिंद्रा सुद्धा थक्क झाले आहेत. मुळात एवढ्या गरम प्लेटला हात लावणेच कठीण आहे आणि त्यात चक्क १६ प्लेट उचलणे म्हणजे कुण्या ऐऱ्या-गैऱ्याचे काम नाही. हे टॅलेंट बघून महिंद्रा यांनी ऑलिम्पिकमध्ये वेटरचे कौशल्य हा खेळ सुरु करायला हवा असे म्हंटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की शेफ गरम तापलेल्या तव्यावर एकाच वेळी १६ डोसे बनवत आहे. जेव्हा हे डोसे तयार होतात तो एक एक डोसा प्लेटमध्ये काढून वेटरच्या हातात द्यायला लागतो. एक- दोन प्लेटवर न थांबता १६ डोसे घेऊन हा वेटर निघतो. एवढंच नव्हे तर अवघ्या २ मिनिटात तो १६ ग्राहकांना त्यांची ऑर्डर देऊनही येतो. महिंद्रा म्हणतात की जर वेटरचे कौशल्य हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सुरु केला तर ही व्यक्ती नक्कीच सुवर्ण पदक मिळवू शकते.

आनंद महिंद्रा यांना वेटरच्या कौशल्याची भुरळ

हे ही वाचा<< “मी रात्री असाच नाचणार कारण.. ” आनंद महिंद्रा यांनी Video ट्वीट करून फॉलोवर्सना केलं खुश

दरम्यान, हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. आनंद महिंद्राच्याच पोस्टला आतापर्यंत ३८ हजारहुन अधिक व्ह्यूज व कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी या वेटरचे कौतुक केले आहे. यापूर्वी काही जाहिरातींमध्ये साऊथ इंडियन हॉटेलमधील वेटर ज्या वेगाने अक्खा मेन्यू वाचून दाखवतात हे ही आपण पाहिले होते, त्यानंतर आता हे वेटरचे कौशल्य सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video anand mahindra shocked by waiter carrying 16 hot masala dosa in just hand ask olympics to start waiter skills game svs