स्केटबोर्डवर तुमची कौशल्ये दाखवण्यासाठी खूप सराव आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांना या कलेचे प्रशिक्षण दिले जाते आणि मग ते उत्कृष्ट स्केटिंग करू लागतात. परंतु व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये स्केटबोर्डवर कुत्रा त्याचे अप्रतिमस्केटिंग स्किल्स दाखवत आहे. कुत्र्याचा स्केटिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खर तर कुत्रा हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. त्याला काहीही शिकवा, तो खूप लवकर शिकतो आणि कोणतीही चूक न करता जस त्या तसं ते करण्यास तो सक्षम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टाइलमध्ये करतोय स्केटिंग

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा आधी आजूबाजूला पाहतो आणि नंतर हळू हळू स्केटबोर्डवर चढतो. मोठ्या टाकीत न पडता तो शिडीवरून खाली येतो. मग स्केटिंग करता करता तो खूप पुढे जातो. स्केटबोर्डला पुढे नेण्यासाठी सामान्यतः लोकांना त्यांचे पाय जमिनीवर ठेवून सुरुवात करावी लागते, परंतु कुत्रा असे काहीही करत नाही. तो स्केटबोर्डवर मोठ्या सहजतेने आणि मजेत पुढे जात आहे.

(हे ही वाचा: Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…)

(हे ही वाचा: सहा सिंहीणीसोबत जंगलात बिनधास्तपणे फिरत होती ही मुलगी, धक्कादायक व्हिडीओ होतोय Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

कुत्र्याला त्या स्केटबोर्डवर स्केटिंग करणे इतके आवडते की तो स्केटिंग करत खूप दूर जातो. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि ‘ये रहे मेरे स्केटिंग गुरु’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. याला अनेकांनी पसंतीही दिली आहे आणि कमेंट करून कुत्र्याच्या टॅलेंटचे कौतुकही केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video have you ever seen a dog skating you will be amazed at the skills ttg