Viral Video Today: रेटिक्युलेटेड अजगर हा जगातील सर्वात लांब आणि तीन सर्वात वजनदार सापांपैकी एक मानला जातो. हा अजगर चावल्यास काही मिनिटांतच गुदमरून किंवा हृदयविकाराचा झटका येऊन माणसाचा बळी जाऊ शकतो. यांनतर हे अजगर त्यांची शिकार पूर्ण गिळतात. अक्षरशः काही सेकंदात, अजगर एखाद्या व्यक्तीच्या शरीराभोवती वेटोळा घालू शकतो. अजगराचा हल्ला इतका जबरदस्त असतो की काही क्षणात व्यक्तीच्या मेंदूतील रक्त पूरवठा बंद होऊ शकतो. श्वास घेणे थांबून मृत्यू ओढवू शकतो. आता हे सर्व वाचून असा अजगर आपल्याला स्वप्नातही दिसू नये अशी तुम्हीही प्रार्थना करत असाल हो ना? पण अलीकडे एका माणसाला चक्क हा हल्ला अनुभवण्याचं दुर्भाग्य वाट्याला आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एक रेटिक्युलेटेड अजगर एका माणसावर हल्ला करताना दिसत आहे. @laris_a9393 या इंस्टाग्राम अकाउंटवर ही क्लिप शेअर करण्यात आली होती. यामध्ये सुरुवातीला ज्याच्यावर हल्ला झाला तो माणूस प्रचंड कॉन्फिडन्समध्ये दिसत होता. त्याने स्वतःच या अजगराला एका पेटीतून बाहेर काढले वहाताना उचलले. यावेळी त्याच्या मागे एक महिला व पाळीव कुत्रा सुद्धा होता.

जेव्हा या माणसाने अजगराला हातात उचललं त्यानंतर समोरून अजगराने जोरदार हल्ला चढवला. त्याने थेट माणसाच्या नाकाला चावा घेतला. हा माणूस या व्हिडिओमध्ये अक्षरशः कळवळताना दिसत आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की अजगाराचा हल्ला किती शक्तिशाली होता..

अजगराने चावलं माणसाचं नाक..

हे ही वाचा<< Video: पाण्यात पेटवली आग, उडवला भडका; डुबकी घेऊन जेव्हा वर आला तेव्हा तोंड…तुफान Viral होतोय ‘हा’ थरार

दरम्यान, यावेळी हल्ल्यात जखमी झालेल्या माणसाचे संपूर्ण कुटुंब त्याला वाचवण्यासाठी मदतीसाठी धावून येते. त्या माणसाच्या चेहऱ्यावरून अजगराला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात पण बराच वेळ हा अजगर माणसाच्या चेहऱ्याला चावत असतो. शेवटी काहीजण कापडाच्या मदतीने अजगराला उचलतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video huge python bites on man nose eaten in front of whole family shocking video goes viral svs