Viral Video : बापलेकीचं नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अन् आपुलकी असते. एका मुलीसाठी तिचे वडील सुपरहिरो असतात तर एका वडीलासाठी त्यांची मुलगी राजकुमारी असते. वडील मुलीला राजकुमारीप्रमाणे जपतो, लहानाचे मोठे करतो, अंगा खांद्यावर खेळवतो, तिचे सर्व लाड पूर्ण करतो पण जेव्हा ती सासरी जाते, तेव्हा क्षण एक वडिलांसाठी खूप कठीण असतो. आपल्या जीवाचा तुकडा असलेली लेक इतरांना सोपवणे, इतके सोपी नसते. मुलीच्या लग्नाचा दिवस प्रत्येक वडिलांसाठी अत्यंत भावनिक दिवस असतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वडिलांना लग्नात मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकताना अश्रु अनावर झाले. भावुक झालेले वडील पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वडील एकटे उभे दिसत आहे. स्टेजवर मुलीचे लग्न सुरू आहे आणि ते अक्षता टाकत आहे पण अक्षता टाकताना हे वडील भावुक होतात आणि त्यांचा अश्रुंचा बांध फुटतो. वडिलाला रडताना पाहून दुरवर उभी असलेली दुसरी मुलगी जवळ येते आणि त्यांना धीर देते. त्यांना मिठी मारते. वडिलांचे अश्रु मात्र थांबत नाही. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या वडिलांची आठवण येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
ghadgefarmhouse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ज्या क्षणी बाबांना कळले…तिला निरोप देण्याची वेळ आली आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोणत्याही भावनांची बाबांच्या अश्रूंशी खरोखर तुलना केली जाऊ शकत नाहीत” आणखी एका युजरने लिहिलेय, “बापाचं दु:ख हे बापालाच कळतं.” एक युजर लिहितो, “बापच प्रेम कधी कधी आईच्या प्रेमावर पण भारी पडतं” तर एक युजर लिहितो, “वडिलांसाठी आणि भावांसाठी हा सर्वात भावुक क्षण असतो.” आणखी एक युजर लिहितो, “माझ्याकडे
शब्द नाही. व्हिडीओ पाहून रडायला आले” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.