Viral Video : नवरा आणि बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आणि आपुलकी दिसून येते. लग्न करून दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. हळू हळू एकमेकांचा स्वभाव, एकमेकांमधील असलेले गुण दोष समजायला लागतात. अशा परिस्थितीत एकमेकांना आहे तसे स्वीकारणे व एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते.

सोशल मीडियावर नवरा बायकोच्या नात्यावर आधारीत अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओमध्ये या नात्यातील गोडवा दाखवला जातो, तर काही व्हिडीओमध्ये या नात्यातील रुसवा फुगवी दाखवली जाते. कधी मजेशीर कन्टेट असतो तर कधी भावुक करणारा कन्टेट असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आज्जीबाई नवरा कसा असतो, याविषयी बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. आज्जी नवऱ्याविषयी काही असं बोलतात की पाहून अनेक महिलांना हे कदाचित खरं वाटू शकतं.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आज्जी दिसेल. ती जेवण करत आहे आणि नातवाशी संवाद साधत आहे. ती सांगते, “सगळे म्हणतात नवरा चांगला.. नवरा चांगला.. नवरा चांगला; नवरा कसा आहे, हे फक्त बायकोलाच माहिती असतं. मी माझ्या अनुभवावरून सांगते, म्हणजे माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगते. जर का डोक्यात राग गेला तर संपलं. ” आज्जीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

priyanka_mogare या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” खरं म्हटलं आजी” तर एका युजरने लिहिलेय, “आजी बरोबर बोलत आहे, नवरा बायकोबरोबर वेगळा असतो. जगासमोर, मुलांसमोर, त्याच्या आईवडीलांसमोर वेगळा असतो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय बोलल्यात आजी.. अगदी बरोबर” एक युजर लिहितो, “पण बायको कशी आहे नवऱ्याला माहिती नसतं” तर एक युजर लिहितो, “आज्जी शंभर टक्के खरं बोलत आहात” अनेक महिलांनी आज्जीच्या या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.