Viral Video : आई आणि मुलीचं नातं हे निस्सीम प्रेमाचं, आणि जिव्हाळ्याचं प्रतीक आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात आईचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आई मुलीला पावलोपावली मार्गदर्शन करते. आई ही एका मुलीची सर्वात जवळची मैत्रीण असते जिच्याजवळ मुलगी प्रत्येक गोष्ट शेअर करते. आईसाठी मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा असते. जेव्हा ही मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तो क्षण एका आई आणि मुलीसाठी भावुक करणारा असतो. लहानपणी बोट धरून चालायला शिकवलेल्या त्याच मुलीला नव्या संसाराच्या वाटेवर निघताना पाहून आईच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात. मुलीसाठी सुद्धा हा क्षण अत्यंत कठीण असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लेक आईला मिठी मारत रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक साडी नेसलेली तरुणी दिसेल. तिच्या लग्न समारंभातील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही तरुणी आईजवळ रडताना दिसत आहे. तिला रडताना पाहून आईसुद्धा भावुक होते. दोघेही एकमेकांना मिठी मारत रडताना दिसतात. पुढे कोणीतरी त्यांना रडू नका, असे खुणावतं. त्यानंतर आई जागेवरून उठते पण लेकीचे डोळे अश्रुंनी भरलेले दिसतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

pratiksha__.amle या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डोळे पाणवले की सगळ्यात अगोदर आईच आठवते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे खरंय” तर एका युजरने लिहिलेय, “आईची माया वेगळीच असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “आई तुझ्या मूर्तिसारखी, या
जगात दुसरी मूर्ती नाही अनमोल, मला
जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही…” एक युजर लिहितो, “आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही” तर एक युजर लिहितो, “किती गोड मुलगी आहे” अनेक युजर्सनी भावुक होत आईचे महत्त्व सांगितले आहे. काही लोकांनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.