सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा जीव काचेच्या भिंतीमुळे वाचल्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका प्राणीसंग्रहालयातील आहे. अनेक पालक आपल्या मुलांना प्राणीसंग्रहालयात घेऊन जातात, तेव्हा ते मुलांचे चांगले फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण आपल्या मुलांचे फोटो काढताना त्यामध्ये एखादा प्राणी कसा दिसेल यासाठी जागा शोधत असतात. पण सध्या एका चिमुकलीचा फोटो काढत असताना अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ IFS अधिकारी @susantananda3 यांनी शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘प्राण्यांसोबत सेल्फी धोकादायक ठरू शकते, काचेमुळे सुदैवाने मुलीला काही दुखापत झाली नाही. पण सगळेच त्या मुलीसारखे नशीबवान असतीलच असं नाही.’ त्यामुळे फोटो काढताना योग्य ती काळजी घ्यायला हवी हेच त्यांना ट्विटमधून लोकांना सांगायचं आहे.

हेही पाहा- समुद्राच्या तळाशी भांडणाऱ्या दोन माशांचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, “कुठेच शांतता नाही…”

हा व्हिडिओ फक्त ४ सेकंदांचा आहे, पण तो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओत, एक लहान मुलगी फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. त्याचवेळी तिच्या मागे दोन वाघ असल्याचंही दिसत आहेत. वाघांच्या आणि मुलीमध्ये एक पाण्याची आणि काचेची भिंत आहे. पालक मुलीचा फोटो काढत असतानाच वाघ अचानक मुलीवर झेप घेतो पण तो काचेवर आदळतो आणि पाण्यात पडतो.

हेही पाहा- Video: उड्डाणपुलावर उभा राहून ‘तो’ उधळत होता पैसे; त्यानंतर जमलेल्या लोकांनी काय केलं ते एकदा पाहाच

मात्र या संपूर्ण घटनेत मुलगी घाबरून आपल्या पालकांकडे पळत जाताना व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर त्याला लाईकही भरपूर लोक करत आहेत. दरम्यान या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये अनेकांनी ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिलेल्या मेसेजचं समर्थन केलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्यानी काचेमुळे चिमुकलीचा जीव बचावल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of tiger jumping on girl goes viral watch shocking video shared by ifs officer jap