बूट घालून शिवलिंगावर बिअरचा अभिषेक करतानाचा VIDEO VIRAL, हिंदू समाजाची पोलिसांत तक्रार

या व्हिडीओमध्ये मद्यधुंद अवस्थेतील दोन तरुण नदीच्या काठावर असलेल्या शिवलिंगावर बिअरचा अभिषेक करताना दिसत आहेत.

Youths-Pour-Beer-on-Shivling
(Image- Pixabay)

Chandigarh Youth Anointing a Shivling With Beer : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मद्यधुंद अवस्थेतील दोन तरुण नदीच्या काठावर असलेल्या शिवलिंगावर बिअरचा अभिषेक करताना दिसत आहेत. नदीच्या काठावर हे शिवलिंग आहे आणि दोन्ही तरुण हातात बिअरचे कॅन घेऊन त्याच्या बाजूला बसले आहेत. यानंतर एक तरुण शिवलिंगावर बिअरचा अभिषेक करतो. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘भोले बाबा’ हे गाणं देखील ऐकू येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ चंदीगढमधला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण नदीच्या काठावरील शिवलिंगावर कॅनमधून बिअर ओतत आहे, तर दुसरा तरुण त्याच्या शेजारी बसून दारू पीत होता. यावेळी दोघांच्याही पायात बूट घातलेले दिसून येत आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ आरोपीच्या एका साथीदाराने शूट केला आहे. दोन्ही तरुण चंदीगडचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये एक तरुण कॅनॉलच्या काठावरील शिवलिंगावर कॅनमधून बिअर ओतत असताना, दुसरा तरुण त्याच्या शेजारी बसून दारू पीत होता. यावेळी दोघेही बूट घातलेले दिसले. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ आरोपीच्या एका साथीदाराने शूट केला आहे. दोन्ही तरुण चंदीगड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अयोध्येच्या सरयू नदीत अंघोळ करताना पत्नीला केलं ‘KISS’, लोकांनी केली बेदम मारहाण

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यानंतर बजरंग दल आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयटी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करणाऱ्या गटांनी आरोपी तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आयटी पार्क पोलीस ठाण्याचे प्रभारी रोहतश यांनी सांगितले की, याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तक्रार सायबर सेलकडे वर्ग करण्यात आली आहे.

आणखी वाचा : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला उत्तर देणारा राज ठाकरेंचा जुना VIDEO VIRAL

याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे बजरंग दलाचे म्हणणे आहे. त्याचवेळी समाजसेवक अरविंद सिंह म्हणाले की, आरोपी तरुणांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. हा भोले बाबांचा अपमान असल्याचे ते म्हणाले. या कायद्याच्या विरोधात हिंदू संघटनांशी संबंधित लोक चंदीगड पोलिस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू परिषदेच्या वतीने आयटी पार्क पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हिंदू परिषदेचे गिरी पंचानन म्हणाले की, हिंदू देवी-देवतांचा अपमान सहन करणार नाहीत. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of two youths anointing shivling with beer goes viral bajrang dal files complaint threatens to protest prp

Next Story
VIRAL VIDEO : लग्नात आनंदाच्या भरात केली फायरींग, चुकून मित्रालाच लागली गोळी, जवानाचा जागीच मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी