Video: लसीकरणासाठी रस्त्यावरील मुलांना बोलावणाऱ्या महिलेचा हा अंदाज बघून तुम्ही आवरणार नाही हसू!

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा महिलेचा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. याला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी बघितलं आहे.

funny covid vaccination video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @trolls_official / Instagram)

सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा जास्त व्हिडीओ पाहिले जातात. तुम्हा सर्वांना माहिती असेल की ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेस पाहता केंद्र सरकारने आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण अनिवार्य केले आहे. लहान मुलांना करोनाचा धोका होऊ नये म्हणून डॉक्टर अगदी रस्त्यावर उतरून बालकांना लस देत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा डॉक्टरांचे पथक लहान मुलांना लस देण्यासाठी वस्तीवर पोहोचले तेव्हा तेथील एका महिलेने आवाज उठवून मुलांना बोलावण्यास सुरुवात केली, ज्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरंतर, या व्हिडीओमध्ये महिलेने ज्या पद्धतीने मुलांना आवाज दिला, ते पाहून तुम्हालाही हसू येईल.

नक्की काय झालं?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की डॉक्टर लसीकरणासाठी परिसरात पोहोचताच. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका महिलेने मुलांना बोलावण्यासाठी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. ती बाई ओरडायला लागते आणि म्हणते, करोनाची लस घे…अय लिल्लू, बिल्लू…अय्या मंजू, अंजू, लीना…सगळे लवकर या. या सगळ्यात विशेष म्हणजे त्याची हरियाणवी स्टाइल लोकांना खूप आवडली आहे.

(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral)

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ४ राशींच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी असते खूप फायदेशीर!)

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना व्हिडीओ इतका आवडला आहे की लोक तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि भरपूर कमेंटही करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video you can not help but smile when you see a woman calling children on the street for vaccinations ttg

Next Story
VIRAL VIDEO : आता कोंबड्यावरही चढला ‘Pushpa’ फिवर, ‘Srivalli’ गाण्यावर त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी