‘जीन एडिटिंग’ या नव्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही ऐकले असेल. या तंत्रज्ञानाचा वापर करून जनुकांमध्ये बदल करता येतो. याच तंत्रज्ञानाचा वापर चीन सैनिकांच्या डीएनएवर करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. पण ‘जीन एडिटिंग’ म्हणजे काय? आणि याचा वापर केल्याने काय धोका निर्माण होऊ शकतो जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून जनुकांमध्ये बदल केला जातो. यामध्ये डीएनएच्या नैसर्गिक रचनेत बदल करून, त्यात काही गोष्टींचा समावेश केला जातो. ‘जीन एडिटिंग’चा वापर करुन अनेक प्राणी, वनस्पती, भाज्या यांवर करून त्याचे वेगवेगळे प्रकार बनवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चीनकडुन ‘जीन एडिटिंग’चा वापर सैनिकांवर केला जात आहे.

आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये तत्कालीन इंटेलिजन्स चीफ जॉन रॅटक्लिफ यांनी चीनकडुन जीन एडिटिंगचा सर्वाधिक वापर होत असल्याचे सांगितले आहे. या रिपोर्टमध्ये ‘जीन एडीटिंग’चा वापर सैनिकांवर केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सैनिकांच्या डीएनएमध्ये परिणामी शरीरामध्येही बदल होणार आहेत. हा बदल का केला जात आहे याची सैनिकांना कल्पना नसल्याचे बोलले जात आहे. या बदलांमुळे मानवाचे शरीर अर्धे रोबोटप्रमाणे होऊन त्यातील भावना नष्ट होतील, तसेच या सैनिकांना अशाप्रकारे युद्धासाठी तयार केले जात आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral news china is using gene editing technology on its soldiers know what it is and how it can be dangerous pns