मित्र असावा तर असा! चक्क सिंहिणीच्या जबड्यातून केली मित्राची सुटका, थक्क करणारा Viral Video पाहिलात का? | Viral trending video Zebra saves another zebra who is attacked by lioness internet says great friendship | Loksatta

मित्र असावा तर असा! चक्क सिंहिणीच्या जबड्यातून केली मित्राची सुटका, थक्क करणारा Viral Video पाहिलात का?

या झेब्र्याच्या धाडसाचे आणि मैत्रीचे नेटकरी कौतुक करत आहेत

मित्र असावा तर असा! चक्क सिंहिणीच्या जबड्यातून केली मित्राची सुटका, थक्क करणारा Viral Video पाहिलात का?
सिंहिणीच्या जबड्यातून या झेब्र्याची कशी सुटका झाली पाहा (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ त्यांच्या गोंडस नकलांवर, त्यांच्या हावभावांवर हसू आणणारे असतात, तर काही त्यांचे रौद्र रूप दाखवून थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहिणीने झेब्र्यावर हल्ला केल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सिंहिणीने झेब्र्यावर हल्ला करत त्याला जबड्यात पकडल्याचे दिसत आहे. आपला मित्र संकटात सापडला आहे, हे लक्षात येताच तिथे असणारा दुसरा झेब्रा मदतीसाठी धावून येतो. मित्राचा जीव वाचवण्यासाठी हा झेब्रा थेट वाघिणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. वाघीण देखील याला प्रतिकार करते. अखेर वाघीणीच्या जबड्यातून झेब्र्याची सुटका करण्यात यश मिळते. पाहा थक्क करणारा हा व्हायरल व्हिडिओ.

आणखी वाचा : चक्क डोक्यावर बाइक घेऊन तो बसवर चढला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले असून, मैत्री निभावणाऱ्या, संकट समोर असतानाही मित्राची मदत करणाऱ्या या झेब्र्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 11:48 IST
Next Story
दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता तरुण अन् नेमकं घडलं अस काही, तुम्हीही वाचून व्हाल हैराण…