Viral video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी सर्वाधिक व्हायरल होणारे व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. मग ते जंगलातील प्राण्यांमधील संघर्ष असू दे की एखाद्या क्युट कुत्र्या, मांजरीचा व्हिडीओ असू दे. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला फार आवडतात. त्यातच घरात पाळलेले प्राणी तर त्यांच्या मालकाच्या इतके जवळ जातात की त्यांना पाहून कोणीही भावूक होईल.खेळांमध्ये बॅडमिंटन हा बहुतेक लोकांचा आवडता खेळ आहे, ज्याचे चाहते जगभरात आहेत. तुम्ही बॅडमिंटनचे अनेक सामने पाहिले असतील, पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला बॅडमिंटन खेळताना पाहिलं आहे का? नाही, मग हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा.

तरुणीसोबत चक्क ३ मांजरीनं खेळलं बॅडमिंटन

व्हिडिओमध्ये तुम्ही तीन मांजरी हा गेम खेळताना पाहू शकता. एका व्यक्तीसोबत मांजरी बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मुलीच्या हातात बॅडमिंटनचं रॅकेट आहे, ती एका हॉलमध्ये आहे आणि तिच्यासोबत तीन मांजरीही तिथे उभ्या आहेत. मांजरांपैकी एक कचरा पेटीच्या वर बसली आहे आणि तिची मालकिन कॉकला हिट करताच ते दुसर्‍या मांजरीकडे पोहोचते, ही मांजर हे कॉक आपल्या पंजाने मारते.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – दिल्ली मेट्रोत ५० रुपयांचा प्रवास फक्त १० रुपयांत…! तरुणानं सांगितली अनोखी ट्रीक

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @lian.shorts नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला यूजर्सची मोठी पसंती मिळत आहे. अनेकजण हा व्हिडिओ शेअरही करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ५९ लाखहून अधिकांनी लाईक मिळाले आहेत.