Devar bhabhi Dance video: सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटात होताना दिसत आहे. लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद… हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळ्यात मोठ्या उत्साने मंडळी डान्स करतात. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. अशाच एक नाहीतर दोन दोन वहिनींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, लग्न सोहळ्यामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.लग्न सोहळ्यात डान्सचा माहोल तयार झाला आहे. या व्हिडीओतील महिला ‘हम आपके है कोण’ या हिंदी चित्रपटातील ‘लो चली मै अपनी देवर की बारात लेके’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत महिलेचा दीर देखील आपल्या वहिनीसोबत थिरकताना दिसतोय. वहिनींच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या-शिट्ट्या आणि पैशांचा पाऊस पाडलेला दिसत आहे.डान्स करत असलेल्या वहिंनीचा मेकअप लक्षवेधी आहे. लो चली मै अपले देवर की बारात ले के, या गाण्यावर त्या डान्स करत आहेत. तर नवरदेवसुद्धा वहिनींना साथ देण्यासाठी डान्स स्टेप करताना दिसत आहे.

दिर आणि वहिनीतील नातं हे प्रेम, आदर आणि मैत्रीचं असतं. त्यांच्यातील बाँडिंग एकदम भारी असतं. दिर म्हणजे वहिनीसाठी मित्र, भाऊ आणि लेकही असतो. त्यामुळेच कोणत्याही तरुणाच्या लग्नाचा आनंद जितका त्याच्या आईला असतो तितकाच त्याच्या वहिनीला असतो दिराच्या लग्नामुळे आनंदी झालेल्या अशाच एका वहिनीने दिराच्या लग्नात धिंगाणा घातला आहे.कोणत्याही घरात दीर आणि वहिनीची जोडी सर्वात हिट मानली जाते. हे नातं मातृत्व आणि मैत्रीचं मिश्रित मानलं जातं. भारतीय लग्नांमध्ये वहिनींची भूमिका महत्त्वाची मानली जाते आणि अशात लग्नातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेण्यासोबतच आपल्या दीरासोबत गंमतही करत असते.या व्हिडीओला कॅप्शनही वहिनी म्हणजे प्रत्येक दिराची दुसरी आईच असं देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ deepabhujbal_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video devar bhabhi dance in marriage 2 women started dancing on his devar entry trending video goes viral srk