Viral Video: गणेशोत्सव म्हटलं की, सगळीकडे उत्साह, आनंद अन् सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळतं. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण बाप्पाचे भक्त मनमुरादपणे जगतात. बाप्पाची भक्ती, सेवा यांसह बाप्पाच्या येण्याचा आनंद आणि नंतर बाप्पाच्या जाण्याचं दुःख अनेकांच्या डोळ्यांत पाहायला मिळतं. गणोशोत्सवात मोदक, मूर्ती, सजावटीबरोबरच गणपती डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आपण पाहतो.
लवकरच संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होईल. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. बाप्पाच्या आगमनाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. याचदरम्यान, बाप्पाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. सोशल मीडियावरही बाप्पाचे लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय; ज्यात काही महिला गणपती डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला कोळी पद्धतीचा पारंपारिक वेशभूषा करून ‘सुप सुप सुपल्या सुपाला घागरी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील त्यांचा डान्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून युजर्सही त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.
हा व्हिडीओ युट्यूबवरील @payalpatilfanclub6429 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप हौशी तुम्ही सर्व छान वाटले ” आणखी एका युजरने लिहिलेय, “गणपती बाप्पा मोरया” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर डान्स.” आणखी एकाने लिहिलंय, “खूपच गोड नाचला ताई.”