Viral Video: लग्नसराईचे दिवस म्हटलं की, हल्ली सोशल मीडियावरही लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पती-पत्नीमध्ये लहान-मोठ्या गोष्टींवरून भांडणं होणं फार मोठी गोष्ट नाही. असं म्हणतात की, लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस वधू-वरांसाठी खूप खास असतात. या दिवसांमध्ये दोघेही एकमेकांशी प्रेमानं, आपुलकीनं बोलतात. पण, लग्न जसं जुनं होतं, तसे दोघांमध्ये वाद सुरू होतात. प्रत्येक जोडप्यामध्ये या सर्व गोष्टी सामान्य आहेत. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नविधी सुरू असतानाच वधू-वरामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न मंडपामध्ये वर वधूच्या भांगेत कुंकू भरत असून, यावेळी वधू मुद्दाम मस्करीमध्ये दोन-तीन वेळा हालचाल करते. यावेळी वर संतापतो आणि रागारागत तिच्या डोक्यात फटका मारून हातातले कुंकू तिच्या भांगेत आणि तिच्या संपूर्ण तोंडावर लावतो. नवऱ्याचं हे कृत्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sweet_mindset_07 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर आतापर्यंत अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

यावर एकानं लिहिलंय, “हा एक दिवस; पण हिचे नखरे नाही उचलू शकत”. तर दुसऱ्यानं लिहिलंय, “काय मूर्खपणा आहे, ती मस्करी करत होती ना”. तिसऱ्यानं लिहिलंय, “वेडाच आहे नवरदेव”.