सोशल मिडिया हा आजच्या काळातील अविभाज्य भाग झाला आहे. सोशल मीडियावर सतत व्हिडिओ पाहणे आजच्या पिढीचा आवडता टाईमपास आहे. अशातच अनेक लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडिओ करतात. अनेकदा लोक व्हिडिओ काही लाईक अन् व्ह्युज मिळवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडतात. व्हिडीओसाठी अनेकदा लोक स्वत:चा अन् इतरांचा जीवही धोक्यात टाकतात. कधी रेल्वे रुळावर, कधी रेल्वे स्थानकावर, कधी रेल्वेमध्ये तर कधी रेल्वेच्या दारात उभे राहून स्टंटबाजी किंवा डान्स करताना दिसतात. निष्काळजीवर्तनामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहे तरी लोक पुन्हा पुन्हा तीच चूक करतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक तरुणी रेल्वेच्या दारात उभी राहून रील व्हिडिओ शूट करत आहे पण जेव्हा तिची आई जेव्हा तीची आई हे पाहते तेव्हा ती लेकीला चांगलीच अद्दल घडवते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

जेव्हा मुलं चुकीचे वागतात किंवा अशा पद्धतीचे धोकादायक स्टंटबाजी करतात तेव्हा त्यांना सुधारणे आणि त्यांना योग्य मार्गावर दाखवणे ही पालकांची जबाबदारी असते. मुलांना समजवण्यासाठी प्रत्येक पालक वेगवेगळी पद्धत वापरतात. काही जण प्रेमाने शांतपणे समजावतात, काही जण मुलांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतात पण काहीजण कठोर शिस्तीचा अवलंब करतात. अनेकदा पालकांना कठोर भूमिका घ्यावी लागते. व्हायरल व्हिडीओमध्ये असेच काहीसे घडते.

स्टंटबाजी करणाऱ्या लेकीला आईने घडवली अद्दल

व्हिडिओमध्ये एक तरुणी धोकादायकपणे चालत्या ट्रेनच्या दारात उभी राहून डान्स करत आहे. एक मुलगा तिचा व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. तरुणी कॅमऱ्याच्या दिशेने पाहून गाणे म्हणत आहे. मध्ये दाराबाहेर डोकावत आहे. हे सर्व सुरू असताना अचानक तिची आई तिथे येते. मुलगी रेल्वेच्या दारात उभी राहून व्हिडिओ करत असल्याचे पाहून आईचा पारा चढतो. आई मुलीला आधी दारातून मागे खेचते आणि धोकादायक स्टंट करण्यासाठी तिला फटकारते. तिलाचा चार-पाच फटके मारून चांगलेच खडसावते.

@mr_rahul_razz या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये, सायबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सर महिलेचे दोन दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती धोकादायक कृत्य करत असल्याचे दिसत आहे. केवळ ऑनलाइन लक्ष वेधण्यासाठी केलेले्या या स्टंटने तिच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण केला होता.

नेटकऱ्यांनी केले आईचे कौतुक

व्हिडिओमध्ये, आई तिच्या मुलीला सार्वजनिक ठिकाणी तिला कानाखाली मारताना दिसत आहे, त्यानंतर मुलगी भीतीने माफी मागू लागते. प्रेक्षकांनी आईच्या ठाम प्रतिक्रियेचे कौतुक केले आहे, अनेकांनी म्हटले आहे की,”तिने पुढील नुकसान टाळण्यासाठी जबाबदारीने वागले पाहिजे.”

या व्हिडिओला ७,००,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि कमेंट्सची लाट आली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “प्रत्येकाला अशी आई मिळावी,” तर दुसर्‍याने विनोद केला, “काकूंनी तिला एका वेगळ्याच पद्धतीने मारले.”

अनेकांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल आईचे कौतुक केले, तर काहींनी असा अंदाज लावला की हा व्हिडिओ व्ह्यूजसाठी बनवण्यात आला आहे का. काही प्रेक्षकांनी घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीवरही टीका केली आणि त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे असे सुचवले.