सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती भररस्त्यात गाडीच्या छतावर बसून दारू पित असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या घटनेची तीव्र निषेध नोंदवला आहे. तर सार्वजनिक ठीकणी अशी कृत्य करु नयेत असंही अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे अनेक लोक आपले एखादे रील, व्हिडिओ व्हायरल व्हावा यासाठी अनेक वेगवेगळे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, स्वत:ला फेमस करण्याच्या नादात अनेकजण अशी काही कृत्य करतात ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. शिवाय अशा स्टंटबाजांना अनेकवेळा चुकीच्या कृत्यांसाठी शिक्षाही भोगावी लागते. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत.

हेही पाहा- “हेल्मेट का नाही घातलं?” पोलिसांच्या प्रश्नावर तरुणीचं भन्नाट उत्तर, Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गाडीच्या छतावर शांतपणे बसून दारू पीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ हरियाणातील गुरुग्राममधील असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. १५ सेकंदाच्या या व्हिडिओमधील व्यक्ती रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालं असताना गाडीवर बसून दारु पित असल्याचं दिसतं आहे. या व्यक्तीच्या हातात दारूची बाटली आणि एक ग्लासही दिसत आहे. शिवाय तो दारु पित असताना आजुबाजूला अनेक लोक आणि गाड्याही दिसत आहेत. तरीही हा व्यक्ती बिनधास्तपणे सार्वजनिक ठीकाणी दारु पीत असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा- ‘बायको सतत फोन कट करतेय, कृपया सुट्टी द्या…’, पोलिसांने लिहिलेला रजेचा अर्ज होतोय Viral

हा व्हिडिओ रवी हांडा नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘हे फक्त गुरुग्राममध्येच शक्य आहे.’ हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, ‘अशा प्रकारे सार्वजनिक ठीकाणी दारु पिल्यास तुरुंगवास होऊ शकतो.’ त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, ‘हा दिल्ली-जयपूर हायवे आहे, तुम्ही गुरुग्रामची बदनामी का करत आहात?’ त्यामुळे हा व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबतची खरी माहिती समोर आली नाही. मात्र, ट्विट करणाऱ्या व्यक्तीने हा गुरुग्रामचा असल्याचा दावा केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of a man sitting on the roof of a car in a traffic jam and quietly drinking alcohol jap