सोशल मीडियावर अनेक वाहनांच्या अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील अनेक अपघातांना वाहन चालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असतो. त्यामुळे अनेकदा काहीही चुक नसतानाही अनेकजण अपघाताचे बळी ठरल्याचंही आपण व्हिडीओमध्ये पाहिलं आहे. अशा अपघातांची सर्व प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय या अपघातांचे व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही पाहा- तरुणाने टाकाऊ टायर्सपासून बनवले वॉशबेसिन; फोटो पाहून हर्ष गोयंका म्हणाले “मला दररोज…”

सध्या अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका कारचालकाची काहीही चुकी नसताना त्याच्यावर मोठं संकट ओढावलं आहे. या अपघाताचा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सना मोठा धक्का बसला आहे. हा अपघात एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही पाहा- Viral Video: स्कुटीवरून जाताना मुली पडल्या नाल्यात, त्यांचा अवतार पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

कारला ट्रकने दिली जोराची धडक –

या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ kabar.jaktim नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत रत्यावरचा ट्रॅफिक सिग्नल लागल्यामुळे एक मोठा ट्रक रस्त्यावर उभा असल्याचं दिसत आहे. त्या ट्रकच्या मागे एक कार उभी असलेली दिसतेय. ट्रक आणि कारचालक सिग्नल सुटण्याची वाट बघत असतानाच मागून येणारा एक भरधाव ट्रक कारला जोरदार धडक देतो ज्यामुळे ही कार पुढील ट्रकमध्ये घुसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

शिवाय मागून आलेला ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. त्यामुळे ट्रक कारला धडकला तरीही तो थांबत नाही. या अपघातात दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर झाल्याचं व्हिडीओत दिसतं आहे. या अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय निष्काळजीपणाने ट्रक चालवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी ही नेटकऱ्यांनी केली आहे. या अपघाताचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आत्तापर्यंत हा ३.५ मिलियनहून अधिकांनी तो पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of road accident a car stopped for a signal was hit by a truck from behind jap