scorecardresearch

Viral Video: स्कुटीवरून जाताना मुली पडल्या नाल्यात, त्यांचा अवतार पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Viral Video: स्कुटीवरून जाताना मुली पडल्या नाल्यात, त्यांचा अवतार पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
मुली ज्या नाल्यात पडल्या आहेत, तो नाला अत्यंत दूषित असल्यामुळे त्यांचे खूप वाईट हाल झाल्याचं दिसत आहे. (Photo : Instagram)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओंमध्ये काही असे असतात ते पाहताच क्षणी आपणाला हसू येतं. कारण ते तेवढे गमतीशीर असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये स्कूटीवरुन निघालेल्या तीन मुली नाल्यात पडल्याच दिसत आहे. त्या नाल्यातून बाहेर आल्यानंतर त्यांचा अवतार पाहून मदतीला आलेल्या लोकांनाही हसू आवरण कठीण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- गाणी ऐकण्यासाठी देशी जुगाड! पठ्ठ्याने बॅटरी आणि विजेशिवाय चालणारा रेडिओ केला तयार; पाहा Video

हा व्हिडीओ जेवढा गमतीशीर आहे तेवढाच धक्कादायक आहे. कारण, या मुली भयंकर पद्धतीने नाल्यात पडल्याचं दिसतं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, तीन मैत्रीणी एका स्कूटीवरून कॉलेज किंवा क्लासला निघाल्याचं दिसतं आहे. त्या रस्त्याने जात असताना स्कूटी चालवणाऱ्या मुलीचा स्कूटीवरचा ताबा सुटल्यामुळे स्कूटी थेट नाल्यात जाते. मुली ज्या नाल्यात पडल्या आहेत तो नाला अत्यंत दूषित असल्यामुळे मुली पुर्ण काळ्या झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

हेही पाहा- बिबट्याचा ‘हा’ अवतार तुम्ही याआधी पाहिला नसेल, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलींचा अवतार पाहून काहींजण हसत आहेत, तर काही लोकांनी त्या नाल्यात गेल्याच कशा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. स्कूटी चालवताना नाल्यात पडलेल्या मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मुलींना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मुलींना स्कूटी व्यवस्थित चालवता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं काहींनी म्हटलं आहे. शिवाय या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा मुलींचे गाडी चालवताना पडलेले जुने व्हिडीओदेखील चर्चेत आले आहेत.

हा व्हिडिओ funtaap नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून तो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘अरे पापा की परी.’ या व्हिडिओला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नेटकऱ्याने लिहिलं आहे की, मुलींचा खूप सुंदर मेकअप झाला आहे.’ तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘अशा मुलींना ड्रायव्हिंग लायसन्स कोण देते हे मला समजत नाही.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 10:45 IST

संबंधित बातम्या