सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्याला पळता भुई थोडी होऊन जाते. जगभरात सापाच्या अनेक प्रजाती आहेत आणि त्यातील बहुतांश प्रजाती विषारी आहेत, त्यामुळे आपल्यासमोर आलेला कोणता साप विषारी असेल हे सांगता येत नाही आणि म्हणून आपण घाबरून जातो. अशा परिस्थितीत माणसांसोबतच प्राणीही सापांपासून अंतर ठेवतात. साप कुठे आणि कधी निघेल याचा काही नेम नसतो. साप निघाल्याची अनेक धक्कादायक प्रकरणे आत्तापर्यंत समोर आली आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून याता व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ बेळगावातील हलगा गावातील आहे. इथे एक चिमुरडी सापाच्या तावडीतून बचावली. ही मुलगी घरातील एका खोलीत जात होती, तेव्हा तिथे भिंतीच्याकडेला एक साप होता. नशीबाने सापाने चिमुकलीवर हल्ला केला नाही. त्यानंतर चिमुकलीनं जेव्हा साप पाहिला तेव्हा ती ओरडत आत खोलीत पळाली. घरात आलेला साप नंतर सर्पमित्रांनी पकडला अन् त्याला जंगलात सोडून दिले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: धावत्या स्कूटीवर पडली झाडाची फांदी, तिघांचीही चिरडून भयानक अवस्था

या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे . आणि या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स येऊ लागले आहेत. सोशल मीडियावर सापांचे व्हिडीओ खूप शेअर केले जातात आणि पहिले सुद्धा जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of snake girl come near it but save life by difference of some second shocking wild life video srk