Viral Video: समाजमाध्यमांवर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका शालेय विद्यार्थीनीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतो. हल्ली सोशल मीडियावर जुनी मराठी गाणीदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत, ज्यावर लोक डान्स करताना दिसतात. त्यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. आता असाच एक डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शालेय विद्यार्थीनी शाळेच्या गणवेश घालून तिच्या घरामध्ये “तेरे आने से”, हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. सध्या तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @preen_the_princess या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “काय नाचली ही” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर केलं दोघींनी”