जेव्हा जेव्हा समुद्रातील प्राण्यांची चर्चा होते, तेव्हा मासे सोडून ऑक्टोपस या प्राण्याची चर्चा नक्कीच होते. दिसायला विचित्र दिसणारा हा प्राणी तरीही खूप खास आहे. या प्राण्यामध्ये असे अनेक रहस्य आहेत. हा ऑक्टोपस पाहतानाच एक विलक्षण अनुभव मिळतो, तर कल्पना करा जर तु्म्हाला या ऑक्टोपससोबत खेळण्याची संधी मिळाली तर? होय. एक व्यक्ती चक्क ऑक्टोपस खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला एक स्कुबा डायव्हर ऑक्टोपसला त्याचा तळहात दाखवतो. पाण्यात पोहणारा ऑक्टोपस सुद्धा त्याच्या तळहाताच्या दिशेने डुबकी मारतो. पण हा स्कुबा डायव्हर लगेच आपला हात मागे घेतो. ऑक्टोपस त्याच्या डोक्याने तळहाताला मारतो. स्कुबा डायव्हर हे दोन वेळा करतो. थोड्या वेळानंतर हे लक्षात येते की ही भिंत अभेद्य आहे आणि मग कंटाळून तो ऑक्टोपस आपला प्रयत्न सोडून आपल्या मार्गाला निघू लागतो. मग हा स्कुबा डायव्हर पुन्हा या ऑक्टोपसच्या अष्टभुजांपैकी एक भुजा ओढत त्याला पुन्हा आपल्याकडे वळवतो. हा ऑक्टोपस माणसाच्या मुठीवर हळूवारपणे बसलेला दिसतो आणि डायव्हर त्याच्या डोक्याला हात लावून त्याच्याशी खेळताना दिसतो.

आणखी वाचा : Lalit Modi-Sushmita Sen च्या नात्यावर जबरदस्त मीम्सचा वर्षाव, वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ट्रेन रद्द झाल्यानंतर भारतीय रेल्वेने विद्यार्थ्यासाठी कॅब बुक केली, वाचा संपूर्ण किस्सा

हा व्हिडीओ ‘Buitengebieden’ नावाच्या ट्विटरवर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. “खेळणारा लहान ऑक्टोपस. शेवटपर्यंत पाहा”, अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ३.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ६२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत ऑक्टोपसचं कौतुक करताना दिसून येत आहेत. ऑक्टोपससोबत खेळण्याचा हा दुर्मिळच क्षण असल्याचं अनेक युजर्सनी सांगितलं आहे. “ऑक्टोपसने त्याला मिठी मारली!!! मला हे आवडलं,” असं एका युजरने लिहिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video scuba diver plays with octopus under sea internet delighted prp