Super Typhoon Yagi: फिलीपिन्स आणि व्हिएतनाममध्ये अशिया सर्वात शक्तीशाली अशा यागी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. व्हिएतनामचा १४ जणांचा चक्रीवादळामुळे मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक जखमी झाले आहे. चीनमधील हेनान प्रांतालाही चक्रीवादळाचा तडाखा बसला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर शंभर लोक जखमी आहेत. यागी हे गेल्या दशकातील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचे हवामानशास्त्रीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान सोशल मीडियावर या चक्रीवादळाचे भीतीदायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. वादळाच्या तडाख्याने इमारती कोसळत आहे तर घराच्या खिडक्या उडत आहे. झाडे उन्मळून पडत असल्याचे दिसते आहे. दरम्यान चीनमधील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. चीनच्या क्यानटांग(China’s Qiantang ) नदीच्या खळखळत्या पाण्याजवळ सेल्फी घेताना असताना काही पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचा काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यटक अनेकदा नदीकिनारी सेल्फी घेतात आणि व्हिडिओ बनवतात, परंतु ही व्हायरल घटना पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसू शकतो. व्हिडिओमध्ये काही पर्यटक नदीच्या काठावर उभे राहून सेल्फी घेत असून व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. दरम्यान, खवळलेल्या नदीच्या लाटा त्यांना वाहून नेत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक प्रेक्षक सेल्फी घेताना दिसत आहेत, त्याचवेळी क्यानटांग नदीचा जोरदार प्रवाहाच्या लाटा किनारी आदळतात आणि त्याबरोबर काठावर उभे असलेले पर्यटकही वाहून जाऊ लागतात. बरेच लोक आपले जीव वाचवण्यात यशस्वी होतात. तर काही पाण्याखाली दिसेनासे होतात. एक्सवर हा व्हिडिओ शेअर करताना @volcaholic1 नावाच्या सदस्याने लिहिले, “चेतावणी- हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का पोहचू शकतो. धोकादायक सेल्फीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे काही दिवसांपूर्वीचे चीनमध्ये नदीच्या काठचे दृश्य आहे. दरम्यान लोकसत्ता व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करू शकले नाही.

हेही वाचा – “कोकणची संस्कृती!”, दादरच्या रेल्वे स्थानकावर कलाकारांनी सादर केली ‘शक्ती तूरा’ लोककला, पाहा Viral Video

येथे पाहा व्हायरल व्हिडिओ

६,९१,००० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने पर्यटकांना भरतीच्या वेळी सेल्फी घेण्यासाठी फटकारले. एका यूजरने लिहिले, “हे लोक मूर्ख आहेत का? आणि पालक मुलांना घेऊन जात आहेत? बौद्धिक समस्या असलेल्या लोकांचा समूह.” दुसऱ्या युजरने कमेंट केली, “निसर्ग नेहमीच जिंकतो. कधीही कमी लेखू नका. ”

“धोकादायक सेल्फीबद्दल जागरूकता पसरवणे महत्त्वाचे आहे, विशेषत: चीनमधील Qiantang नदीसारख्या धोकादायक ठिकाणी,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार

बीबीसीच्या वृत्तानुसार, २०१३ मध्ये Qiantang नदीवर अशीच एक घटना घडली होती ज्या दरम्यान किमान ३० लोक भरतीच्या लाटेमध्ये जखमी झाले होते.

सीएनएनच्या वृत्तानुसार, दक्षिण चीनच्या हैनान बेटावर सर्वात शक्तीशाली चक्रवादळ यागीने चार लोकांचा बळी घेतला.

इतर अहवालांनुसार, फिलीपिन्समध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला, तर सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ यागीमुळे दरम्यान व्हिएतनाममधील किनारपट्टीच्या शहरांमधून जवळपास ५०,००० लोकांना हलवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows tourists being swept away while taking selfies near chinas qiantang river snk