सोशल मीडियावर प्राण्याचे व्हिडिओ या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. आतापर्यंत कासव आणि ससा यांची गोष्ट ऐकलं आहे. गोष्टीत हुशार कासव एकदम हळूहळू करत शर्यंत जिंकतं आणि आळशी ससा हरतो. मात्र काही वर्षांपूर्वी ऐकलेल्या गोष्टीतला कासव थोडा खोडकर झाल्याचं एका व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे. कासवाने थेट कुत्र्याला डिवचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कासव कुत्र्याला इतकं हैराण करतो की, हल्ला करताच तो लपतो. हा व्हिडिओला नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ २०२१ वर्षातील सर्वोत्कृष्ट व्हिडिओ असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हिडिओत
कुत्र्याला डिवचल्यानंतर आपल्यावर हल्ला होणार हे कासवाच्या लक्षात येतं. निसर्गाने दिलेलं कवच तो लपण्यासाठी वापरतो. कासवाला त्या ठिकाणाहून पळ तर काढता येणार नाही. मग कुत्र्याला डिवचलं की कवचामध्ये लपतो. कुत्रा शांत झाल्याचं पाहून कासव पुन्हा त्याला डिवचतो. दोन्ही प्राण्यांमधली जुगलबंदी नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे.

फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक्स केले आहेत. तसेच व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video turtle repeatedly annoying dog rmt