Viral Video: आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतो. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. यापैकी डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. आताही असाच एक दोन जुळ्या बहिणींचा सुंदर डान्स व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनेक जुळ्या भावंडांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यात कधी एकसारख्या जुळ्या बहिणी तर कधी भाऊ एकत्र आपली कला सादर करताना दिसतात. यापैकी अनेक जुळ्या भावंडांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध देखील मिळते. सध्या अशाच दोन जुळ्या बहिणींचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये त्या डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन जुळ्या बहिणी भररस्त्यात उभ्या राहून ‘चिटिया कलाईया वे’, या हिंदी गाण्यावर खूप सुंदर डान्स करत आहेत. विशेष म्हणजे दोघींचा डान्स अगदी हुबेहुब असून दोघींचा चेहरा, उंची, कपड्यांची स्टाईल, शूज, हेअर स्टाईल सगळंच सारखं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nainikathanaya या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स त्यांच्या व्हिडीओवर कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

एकाने लिहिलंय की, “एकदम सुंदर डान्स केला”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “दोघीही खूप छान नाचलात”. तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “दोघीही सुंदर दिसतायत आणि नाचतायत”