लग्न म्हटलं की धमाल आलीच. हल्लीच्या काळात नवरी आणि नवरदेव कोणताच संकोच न ठेवता बिनधास्त अंदाजात आयुष्यातला हा खास दिवस एन्जॉय करत असतात. लग्न ठरलं की हल्लीच्या नववधू सुंदर दिसण्यासाठी लग्नाआधीच डाएटिंग करायला लागतात, तर काही नववधू उत्साह आणि अस्वस्थतेमुळे लग्नाच्या दिवशी जेवण करत नाहीत. पण सध्या सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यात लग्नाला काही मिनिटं शिल्लक राहिले असताना ही नवरी नवरदेवाची वाट पाहण्याऐवजी भतलंच काम करताना दिसून आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नात नवरी लवकर नटून थटून नवरदेवाची वाट पाहत असते. पण या व्हायरल व्हिडीओमधली नवरी मात्र लग्नासाठी नटण्याचं कोणतंच टेन्शन न घेता भलतंच काम करताना कॅमेऱ्यात कैद झाली. आता असं या नवरीने नेमकं केलं तरी काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर तुम्हीच व्हिडीओ पाहा.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली नवरीला थोड्या वेळाने मंडपात जायचं होतं. काही क्षणात लग्न मंडपात वऱ्हाडी मंडळी सुद्धा येणार आहेत. लग्नासाठीची तयारी शिल्लक राहिलेली असताना या नवरीला अचानक भूक लागली. काही क्षणांत लग्न सोहळा सुरु होणार असला तरी ही फूडी नवरी मॅगीवर ताव मारताना दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये एक मैत्रिण तिला काही वेळात नवरदेव येईल, असं सांगताना दिसून येतेय. नवरीचा साज चढवल्यामुळे आता काही वेळाने तिला बोहल्यावर चढणार होती. पण मध्येच तिला भूक सहन न झाल्याने कशाचीही चिंता न करता ती बिनधास्तपणे मॅगी खाताना दिसली. नवऱ्याचा आता वाट पहावी लागणार असं म्हणत नवरी मॅगी खात आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

आणखी वाचा : पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर वर्दीतल्या वडिलांना सलाम ठोकला; बाप-लेकीचा फोटो VIRAL

या व्हिडीओमध्ये नवरीचं उत्तर ऐकून सगळे हसायला लागतात. नववधूचं म्हणणे आहे की तिला तयार होण्यासाठी अर्धा तास ते दोन तास लागू शकतात. ‘The Shaadi Swag’ नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ‘नवरदेवाला वाट पाहू द्या!’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत ३३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या लग्नातली गंमती आठवू लागल्या आहेत. तर अनेक मुलींनी भविष्यात त्यांच्या लग्नात असंच काही घडेल, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये नवरदेव नव्हे तर या फूडी नवरीला पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video video of bride eating maggi before marriage goes viral where to wait for the groom watch video prp