Viral Video: काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘सुंदरी सुंदरी’, ‘उई अम्मा’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील महिला कोल्हापुरी हलगीच्या ठेक्यावर नाचताना दिसतेय.
सोशल मीडियावर विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक महिला खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला मराठमोळ्या कोल्हापुरी हलगीच्या तालावर नाचताना दिसतेय. यावेळी तिने हातात लेझीमदेखील घेतलेली आहे. तिची प्रत्येक स्टेप अन् चेहऱ्यावरील हावभाव तुमचेही लक्ष वेधून घेतील. सध्या तिचा हा डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
@suvarnakale333 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज अन् लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओ कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, की, “हिच्यापुढे गौतमी फिकी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरी लावणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुरेखा पुणेकर यांच्या नंतर खरा रत्न म्हणजे सुवर्णा काळे ” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
