Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हल्ली सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यातील काही व्हिडीओ निरर्थक विषयांवर आधारित असतात, ज्याला व्ह्यूज लाखो असल्या तरीही त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल असे काहीच नसते. पण, अनेक युजर्स असेही असतात, जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण‘चुटामल्ले’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. तरुण करत असलेला डान्स कमालीचा असून त्याने केलेल्या डान्स स्टेप्सही खूप भन्नाट आहेत. त्याचा हा डान्स सध्या सोशल मीड्यावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gauravsitoulaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “नोराचा धाकटा भाऊ”, तर दुसऱ्याने लिहिलंय, “एकच नंबर भावा”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “अतिशय सुंदर डान्स भावा”