लग्न म्हटलं की सुंदर आणि डिझायनर निंमत्रण पत्रिका आवर्जून तयार केल्या जाता. सोशल मिडियावर एका पेक्षा एक लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहे. काही पत्रिकेसह महागड्या चॉकलेटसह दिले जाता.तर बहुतेक लोक पर्यावरणांची काळजी घेत पर्यावरणपूरक पत्रिका तयार करत त्याबरोबर झाडाचे रोप भेट म्हणून देतात. नुकतीच एक जुनी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये नवरा नवरीची शिक्षण म्हणजेच त्यांची शैक्षणिक पदवी देखील लिहिली आहे.
एक्सवर (ट्विटर) व्हायरल होत असलेल्या लग्नपत्रिकेमध्ये नवऱ्याच्या नावासमोर आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) जोडले गेले आहे तर नवरीच्या नावासमोर, आयआयटी दिल्ली (IIT Delhi) जोडले गेले आहे. महेश नावाच्या व्यक्तीने लग्नाच्या पत्रिकेचा फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिल की, ”लग्नासाठी फक्त प्रेम महत्त्वाचे असते.” अनेकांना ही पोस्ट पाहिली, काही जणांनी पसंती दर्शवली तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
हेही वाचा – ”चॉकलेट परत दे!”, सही दिल्यानंतर धोनीने चाहत्याकडे मागितले चॉकलेट; व्हायरल होतोय मजेशीर व्हिडीओ
एकाने लिहिले, “अभ्यासक्रमासाठी समतुल्य. काही दशकांपूर्वी, जेव्हा पदवी मिळवणे कठीण होते, तेव्हा बीएससी, बीकॉम सारख्या पदवीचा उल्लेख करणे ही मोठी गोष्ट मानली जात होती. मी एक निमंत्रण पाहिले आहे जेथे एका बाजूला आडनाव आहे. कुटुंब हे लिहिलेलेही नव्हते (‘कारण दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते).
दुसर्याने लिहिले की, “मी तिथे होतो, काजू कतली, लग्नाचा केक आणि चाटवरही लिहिले होते. पाहुण्यांच्या आहेरच्या पाकीटावरही त्याचा उल्लेख करण्याची सूचना देण्यात आली होती.”
हेही वाचा – ….म्हणून अनिल कुंबळे यांना करावा लागला चक्क सार्वजनिक बसने प्रवास, व्हायरल होतोय
“निमंत्रणात त्याच्या मोठ्या, पगाराचा, लिंक्डइन प्रोफाइलचा उल्लेख नसल्यामुळे निराश झालो,” तिसऱ्याने विनोद केला. चौथ्याने लिहिले “अरे रँक गायब आहे.” पाचव्याने विचारले, “हे हास्यास्पद आहे! त्याने मला त्यांचे GPA का सांगितले नाही?”