Nepal protesters Who are Gen-Z: नेपाळमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्युबसारख्या एकूण २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्यात आली. या बंदीविरोधात हजारो तरूण-तरूणींनी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली सरकारविरूद्ध तीव्र आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान अनेक जण संसद भवनातही घुसले. हे आंदोलन हिंसक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सराकरने या भागात कर्फ्यूही लागू केला. मात्र, या तीव्र आंदोलनानंतर सरकारने माघार घेत या साइट्सवरील बंदी मागे घेतली आहे.
आंदोलनात कोण सामील होते?
काठमांडू इथल्या आंदोलनात हजारो तरूण सामील होते. नेमकं हेच कारण आहे की या आंदोलनाला ‘जेन-झी रिव्होल्यूशन’ (Gen-Z Revolution) असं म्हटलं आहे. या आंदोलनात विद्यार्थी आणि नव्या पिढीतील तरूणांनी सरकारविरूद्ध आवाज उठवला.
कोण आहेत हे Gen-Z?
Gen-Z जेन-झी ही एक पिढी आहे, तिला जनरेशन झेड असे म्हटले जाते. ज्यांचा जन्म १९९७ ते २०१२ दरम्यान झाला आहे ती पिढी म्हणजे जेन-झी. म्हणजे आताच्या काळात हे लोक किशोरवयीन आणि तरूण मुलं-मुली आहेत. ही पिढी डिजिटल टेक्नॉलॉजी, इंटरनेट, सोशल मिडिया आणि स्मार्टफोन यासोबतच वाढली आहे. या पिढीतील लोक सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय राहतात.
या पिढीची वैशिष्ट्यं काय?
- Gen-Z मधील तरूण सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहेत. त्यांचं बालपण मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया आणि गेमिंग यासोबत गेलं आहे.
- यांना सोशल मीडियावर कंटेंट बनवणं, नव्या कल्पनांचा विचार करणं आणि आर्टिस्टिक काम करणं जास्त आवडतं. हे फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवतात.
- Gen-Z जेंडर इक्वॅलिटी म्हणजेच स्त्री-पुरूष समानता यासारख्या अनेक मुद्द्यांबाबत परखडपणे बोलतात. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ऑनलाइन कॅम्पेन वगैरे याचा आधार घेतात.
- हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं कल्चर सेटअप करतात. रोज नव्या गोष्टी आत्मसात करतात आणि नवनवीन ट्रेंड्स सेट करतात.
- Gen-Z क्रिएटिव्हिटीवर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या स्वत:ला सादर करण्याच्या कौशल्याला कायम अपडेट करत असतात.
- टेक्नॉलॉजीच्या बाबतीत Gen-Z सर्वात पुढे आहे.
नेपाळमध्ये सरकारकडून एकूण २६ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी आणली गेली. हजारो जेन-झी या निर्णयामुळे संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. अनेक तरूण युट्यूबवरून त्यांचा अभ्यास करतात. काहींचं असंही म्हणणं आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची चागंली कमाई होत होती, मात्र बंदीनंतर हे सर्व ठप्प झाले. ४ सप्टेंबरपासून नेपाळ सरकारने या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. बंदी हटवण्यासाठी आधी सरकारला विनंती करण्यात आली होती. मात्र, सरकारने कोणतीही पावलं न उचलल्याने सोमवारी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये जेन-झीने तीव्र आंदोलन केले.