Woman Swims 36 KM In Mumbai Arabian Sea Video Viral : एका महिलेनं असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो सर्वांना थक्क करणारा आहे. कारण या महिलेनं वरळी सी लिंकपासून गेटवे ऑफ इंडियाचं ३६ किमीचं अंतर समुद्रात जलपरीसारखं पोहून पार केलं. तिने केलेली ही भन्नाट कामगिरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. हा व्हिडीओ सुचिता देब बर्मन नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या महिलेनं जीवाची बाजी लावून समुद्रात पोहून वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया असा प्रवास पूर्ण केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, माझ्या पद्धतीने मुंबईचं ३६ किलोमीटरचं अंतर पार केलं…व्हिडीओला इन्स्टाग्रामवर ३ लाख ६४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओला ६ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ प्रचंड गाजल्याने नेटकऱ्यांनीही प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, खरंच महिलेचा हा व्हिडीओ थक्क करणारा आहे.

नक्की वाचा – Video: भिंतीला प्लास्टर करण्यासाठी कामगाराने केला भन्नाट जुगाड, कमी वेळात झालं जास्त काम, यूजर्स म्हणाले, “गरिबांना…”

इथे पाहा जलपरीचा व्हायरल व्हिडीओ

महिलेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स काय म्हणाले?

एका यूजरने म्हटलं, कसा होता अनुभव? तुम्ही महान आहात. असंच पुढे जात राहा. दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, अविश्वसनीय. हे प्रेरणादायी आहे. तिसरा यूजर म्हणाला, खूप प्रेरणादायी व्हिडीओ आहे. पट्टीचे पोहणारे अनेक विक्रम करतात. पण या तरुणीने पावसाळ्याच्या दिवसात धाडस दाखवून समुद्रात पोहण्याचा पराक्रम केला. या महिलेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अन्य एका यूजरने म्हटलं की, पुढे आणखी किर्तीमान करायचे आहेत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. तुमच्यासाठी एकच शब्द म्हणेल. G.O.A.T (Greatest Of All Time)

व्हिडीओला कमेंट करत चौथ्या यूजर्सने म्हटलं, छान, हे खूप अद्भुत आहे. खुल्या पाण्यात ३६ किमीपर्यंत पोहणं खूप मोठी कामगिरी आहे. पाचव्या यूजरने म्हटलं, तुम्ही जादूगार आहात. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. मी सुद्धा पट्टीचा पोहणारा आहे आणि मला माहितेय ३६ किमीपर्यंत पोहणं किती अवघड असतं. मी आतापर्यंत सर्वात जास्त ७.५ किमीपर्यंत पोहलो आहे. यासाठी तीन महिने दररोज सहा तास पोहण्याचा सराव करावा लागला. मी मागील एक वर्षापासून दररोज एक किलोमीटरपर्यंत पोहतो, असं एका यूजरने म्हटलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman swims 36 km in mumbai arabian sea from worli sea link to gateway of india instagram video viral on internet people stunned nss