पूर्वीचे लोक अभ्यंगस्नान करण्यासाठी उटणं, चंदन याचा वापर करायचे. परंतु कालांतराने या उटण्याची जागा साबणाने घेतली. सकाळी अंघोळ करायची म्हटलं की साबण हा हवाच. जर साबण नसेल तर अंघोळ झालीच नाहीये असं वाटतं राहतं. सुरुवातीच्या काळामध्ये काही ठराविक कंपन्याच साबणाची निर्मिती करत असतं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जवळपास एकसारखेच साबण पाहायला मिळत. मात्र कालांतराने साबणाची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या, ब्रॅण्ड अस्तित्वात आले आहे. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे साबण बाजारात सहज उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे बाजारात या साबणांची मागणीही वाढू लागली. परिणामी साबणांच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली. आता १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात सहज मिळतात. परंतु एक साबण असा आहे ज्याची किंमत हजार रुपयांमध्ये नाही तर चक्क लाख रुपयांमध्ये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं म्हटलं जातं की श्रीमंतांचा थाटच वेगळा असतो. त्यांच्या प्रत्येक गोष्टींमधून त्यांचं लक्झरी लाईफ दिसून येतं. त्यामुळे महागडी गाडी, घर,कपडे, अगदी महागड्या मद्याविषयीही आपण ऐकलं असेल. पण महागड्या साबणाविषयी फार कमी जणांना माहित आहे. परंतु जगात एक साबण प्रचंड महाग असून त्याची किंमत चक्क १ लाख ८० हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा साबण महाग असण्यामागेही तसं कारण आहे.

लेबनान नामक उद्योगसमूह या साबणाची निर्मिती करत असून हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याचं सांगण्यात येतं. जवळपास १०० वर्षापासून या साबणाची निर्मिती करण्यात येत आहे. परंतु हा साबण महाग असल्यामुळे याची खरेदी करणारेही फार कमी ग्राहक आहेत.

वाचा :  स्वत:च्याच प्रेमात पडली अनुष्का; म्हणाली…

या साबणाची निर्मिती केवळ मागणी असल्यावरच केली जाते. हा साबण तयार करण्यासाठी सोन्याची आणि हिऱ्याची पावडर वापरली जाते. त्यामुळे हा साबण प्रचंड महाग आहे. मात्र तरीदेखील उच्चभ्रु लोकांमध्ये त्याची लोकप्रियता कमालीची आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds most expensive soap ssj