भारतीय महिलांच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच खूप साऱ्या साड्या असतात. साडीमधला तुमचा लूक पारंपारिक आणि स्टायलिशही दिसतो. साडीची खास गोष्ट म्हणजे ती तुम्ही कोणत्याही प्रसंगी सहज कॅरी करू शकता. ऑफिसपासून ते कॅज्युअल मेळाव्यापर्यंत आणि पुजेपासून पार्टीपर्यंत साड्या हाच योग्य पोशाख आहे. हल्ली अनेत स्त्रिया आधुनिक आणि स्टायलिश कपडे परिधान करत असल्या तरी कधीकधी त्यांना साडी नेसणं आवडत असतं. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या साड्या असतात. ४ ते ५ वेळा साडी नेसल्यानंतर महिलांना ती पुन्हा नेसायला कंटाळा येतो, असं अनेकदा घडतं. याचं कारण म्हणजे ती त्या साडीच्या लूकला महिला कंटाळतात किंवा ती साडी जुनी झाल्यानंतरही तुम्हाला तुमची महागडी साडी पुन्हा नेसता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा वेळी तुमच्या जुन्या साड्या कपाटाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात धूळ खात राहतात. तुमच्याकडेही जुन्या साड्या असतील आणि तुम्ही नवीन लूकच्या हव्यासापोटी त्या परिधान करत नसाल तर काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या जुन्या साडीला नवा आणि स्टायलिश लुक मिळवू शकता. जाणून घेऊया. जुन्या साडीला नवीन पद्धतीने कॅरी करण्याच्या टिप्स आणि ट्रिक्स…

ब्लाउज
कोणतीही साडी पारंपारिक ते मॉडर्न लूकमध्ये बदलण्यात ब्लाउज डिझाइन महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या जुन्या साडीला नवीन डिझाईन्स जोडून तुम्ही स्टायलिश लुक मिळवू शकता. जुन्या साडीसोबत पेप्लम किंवा क्रॉप टॉप स्टाइलचा ब्लाउज घाला.

ड्रॅपिंग
तुम्ही ज्या पद्धतीने साडी घालता त्याप्रमाणे तुम्ही तुमचा लुक देखील बदलू शकता. साडीला पँट स्टाईल ड्रेप करता येते. याशिवाय पल्लूमध्ये तुम्ही वेगळी स्टाइल अवलंबू शकता.

आणखी वाचा : Fashion Tips : ‘शरारा’च्या या पाच डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत, स्टायलिश एथनिक लुकसाठी एकदा ट्राय नक्की करा!

दागिने
साडीसोबत तुमच्या ज्वेलरी आणि अॅक्सेसरीजची निवड लक्षात घेऊन तुम्ही तुमचा लुक स्टायलिश बनवू शकता. स्टेटमेंट ज्वेलरी, ट्रेंडी ज्वेलरीसह स्वतःला स्टाइल करा.

आणखी वाचा : Wedding Fashion Tips : नवरीसाठी हे पाच स्टायलिश ‘ब्रायडल फुटवेअर’ ; पायाचे सौंदर्य नक्कीच वाढेल

हेअरस्टाईल
तुमची हेअरस्टाईल बदलून कोणत्याही जुन्या साडीवर नवा लूक घेता येईल. जर तुम्ही अनेकदा अंबाडा बनवत असाल तर केस कुरळे करा किंवा स्टायलिश पद्धतीने बांधून बघू शकता.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion old saree reuse ideas to look different styling tips prp
First published on: 06-12-2021 at 22:15 IST