‘जिवलगा’ ते ‘श्यामचे वडिल’ तुषार दळवीचा हा वीस वर्षांचा प्रवास.
रोमॅन्टीक हीरो ते पित्याची मध्यवर्ती अथवा शीर्षक भूमिका अशी ही त्याची वाटचाल. ‘जिवलगा’च्या वेळी दिग्दर्शक महेश कोठारेने त्याला रेशम टिपणीसचा प्रेमिक म्हणून पहिली संधी दिली.. पण मराठीत रोमॅन्टीक नायकाला स्थान मजबूत करणे खूप कठीण जाते. बावळट वा विनोदी शैलीच्या नायकांची आणि सोशिक नायिकांची कायम चलती असते. म्हणजे, त्याचे व्यक्तिमत्त्व भाबडेपणाला साजेसे नाही व दयाळू नायक म्हणूनही तो शोभत नाही. अशा वेळी एकेक चित्रपट मिळवत मिळवत मार्ग काढावा लागतो. जोडीला नाटक, मराठी व हिंदी मालिका यांच्या आधारे तुषार दळवी घडला-वाढला-टिकला. हिंदी चित्रपटाच्या देखणा हीरोचे व्यक्तिमत्त्व असूनही तो तेथे वळू शकला नाही, हे त्या उद्योगाचे दुर्दैव. मराठीत वयपरत्वे भूमिकांचे स्वरूप बदलले. ‘मृगजळ’, ‘चिमणी पाखरं’, ‘भेट’ अशा काही चित्रपटात पिता साकारला. ‘श्यामचे वडील’ या वाटचालीत मोठीच झेप म्हणायची. अजय पाठक निर्मित व आर. विराज दिग्दर्शित या चित्रपटात आजच्या काळातला पिता साकारायला मिळाल्याने तुषार दळवी जास्तच खुश आहे. तेच तर महत्त्वाचे असते. म्हणूनच वीस वर्षांची आपली वाटचाल कधी बरे पार पडली हे त्यालाच समजले नाही.             

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This journey of 20 years