तंत्र क्षेत्रातील कौशल्यप्राप्त मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी इन्स्टिटय़ूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझिरग इन्स्ट्रमेन्ट्स (आयडीईएमआय) या संस्थेची स्थापना १९६९ साली केंद्र सरकारने केली. ही संस्था केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत करणारी संस्था marg05आहे. या संस्थेने औद्योगिक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाच्या कौशल्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे विविध अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. लघु मुदतीचे हे अभ्यासक्रम माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे अभ्यासक्रम नियमितरीत्या आयोजित केले जातात.
* डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग- कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करू शकतात. या अभ्यासक्रमात प्रोग्रॅमिंगचे कौशल्य उमेदवारांना शिकवले जाते. ‘सी’ आणि ‘सी प्लस प्लस’ यासारख्या संगणकीय प्रोग्रॅमिंगच्या भाषा यात शिकवल्या जातात. याशिवाय जावा, अ‍ॅडव्हान्स्ड जावा अशा भाषा शिकवल्या जातात. प्रोग्रॅिमग कसे करायचे याचे प्रात्यक्षिकही करून घेतले जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी-तीन महिने. शुल्क-२५ हजार रु.
* डिप्लोमा इन सॉफ्टवेअर टेस्टिंग- संगणकीय प्रोग्रॅिमग भाषा आणि डाटाबेस यांचं ज्ञान असलेली व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकते. कालावधी- चार महिने. प्रत्येक बॅचला ३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. शुल्क- १८ हजार रुपये. या अभ्यासक्रमात सॉफ्टवेअर तपासणीचे तंत्र शिकवले जाते.
* डिप्लोमा इन अ‍ॅण्ड्रॉइड प्रोग्रॅमिंग- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. या अभ्यासक्रमात अ‍ॅण्ड्राइड प्रोग्रॅमिंगचे विविध लेआउट शिकवले जातात. ‘गुगल प्ले’वर अ‍ॅप्स कसे प्रकाशित करावेत याचे प्रशिक्षण दिले जाते. बॅचनिहाय प्रवेशजागा- ३०. शुल्क- २५ हजार रुपये.
* कॉम्प्युटर सॉफ्टवेअर- या अभ्यासक्रमात एमएस ऑफिसमध्ये समाविष्ट असणाऱ्या वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट तसेच फॉक्स प्रो, इंटरनेट, टॅली याविषयी प्रशिक्षण दिलं जातं. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन महिने. अभ्यासक्रमाचे शुल्क- चार हजार रुपये.
* डेस्क टॉप पब्लिकेशन- हा अभ्यासक्रम दोन महिने कालावधीचा आहे. शुल्क- ४ हजार रुपये. पिंट्रिंग प्रेस आणि जाहिरात क्षेत्रातील डिझायिनग क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासक्रमात कोरल ड्रॉ, फोटोशॉप, पेजमेकर आदींविषयक प्रशिक्षण दिलं जातं. प्रवेशजागा- ३०.
* कॉम्प्युटर हार्डवेअर, मेन्टेनन्स, इन्स्टॉलेशन, नेटवìकग अ‍ॅण्ड मल्टीमीडिया- हा अभ्यासक्रम दहावी आणि त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना करता येतो. या अभ्यासक्रमात ऑपरेशन सिस्टिमची स्थापना, मल्टिमीडिया कार्यप्रणाली, स्कॅनर, पिंट्रर, विंडो एक्सपी प्रोफेशनल, नेटवर्किंगची मूलतत्त्वे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या समस्यांच्या निराकरणाचे तंत्र आदींचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन महिने. शुल्क- ४ हजार रुपये आहे. प्रवेशजागा- ३०.
* अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटर नेटवर्किंग- हा अभ्यासक्रम दोन महिने कालावधीचा आहे. शुल्क- ७ हजार ५०० रुपये. नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर होण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासक्रमात नेटवìकगची मूलतत्त्वे, विंडो सव्‍‌र्हरची स्थापना, युझर्स ग्रुप्स, पॉलिसी मॅनेजमेंट, डिस्क मॅनेजमेंट, लिनक्स आदींचं प्रशिक्षण दिलं जातं.
प्रवेशजागा- ३०.
* सर्टिफाइड नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर- या अभ्यासक्रमाचा कालावधी एक महिना असून या अभ्यासक्रमाला ३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. शुल्क- सहा हजार रुपये. या अभ्यासक्रमात नेटवìकगची मूलतत्त्वे, क्लासलेस अ‍ॅड्रेसिंग, रुटर्सची तोंडओळख, रुटर प्रोटोकॉल बेसिक्स, फायरवॉल आणि इंटर्नल रुटर्स, वायरलेस तंत्रज्ञानाची तोंडओळख, वाइड एरिया नेटवर्कची ओळख आदी विषय
शिकवले जातात.
* डिप्लोमा इन इन्फम्रेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा आहे. प्रवेशजागा- ३०. शुल्क- १ लाख २५ हजार. संगणकीय माहिती चोरी जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने माहिती सुरक्षा व्यवस्थापनाची दिवसेंदिवस गरज भासू लागली आहे. या अभ्यासक्रमात माहिती सुरक्षा व्यवस्थापनाच्या विविध मूलभूत संकल्पना, एथिकल हॅकिंग, वेब अ‍ॅप्लिकेशनची सुरक्षितता, सíव्हसेस आणि सव्‍‌र्हर, डिजिटल सर्टिफिकेट, डिझास्टर रिकव्हरी प्लॅनिंग आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नेटवर्किंग या विषयाच्या ज्ञानासह कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करू शकतो.
* अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन इन्फम्रेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट- संगणकीय माहितीच्या सुरक्षा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रगत कौशल्य आणि तंत्र या अभ्यासक्रमात शिकवलं जातं. त्या अनुषंगाने अधिकाधिक वेब अ‍ॅप्लिकेशन, सव्‍‌र्हर टेक्नॉलॉजी, डिजिटल सर्टििफकेशन मेथड्स, हॅकिंग टेक्निक्सचे कौशल्य या प्रशिक्षणाद्वारे शिकवले जाते. डिजिटल सर्टिफिकेशन मेथड्स, एथिकल हॅकिंग आदी विषयांवर या प्रशिक्षणात भर देण्यात येतो. दररोज प्रात्यक्षिकांच्या सरावावर भर देण्यात येतो. नेटवìकग या विषयाच्या ज्ञानासह कोणत्याही विषयातील पदवीधरांना हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा महिने. शुल्क- सव्वा लाख रुपये. प्रवेशजागा- ३०.
* डिप्लोमा इन डाटा बेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (ओरॅकल डीबीए)- या अभ्यासक्रमात माहिती व्यवस्थापनकौशल्य व तंत्र शिकवलं जातं. संगणकीय डेटाची साठवणूक, संगणकातील माहितीचा बॅकअप, कार्यप्रणालीचं व्यवस्थापन आदी बाबींची माहिती दिली जाते. ‘सी’ आणि ‘सी प्लस प्लस’ ही संगणकीय भाषा अवगत असणाऱ्या कोणत्याही विषयातील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा आहे. शुल्क- ५० हजार रुपये. कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करू शकतो. या अभ्यासक्रमाला ३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. विविध प्रकारचे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी साहाय्य केलं जातं.
पत्ता- आयडीईएमआय-पूर्व द्रुतगती मार्ग, एव्हरार्ड नगर, बसस्टॉपच्या विरुद्ध दिशेला, स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभट्टी, मुंबई-४०००२२. वेबसाइट- http://www.idemi.org ईमेल- trainig@idemi.org

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नया है यह!
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सíव्हस)- हा अभ्यासक्रम रिझव्‍‌र्ह बँकेने स्थापन केलेल्या पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट या संस्थेने सुरू केला आहे.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे.
पत्ता- एनआयबीएम, खोंडवे खुर्द, पुणे- ४११०४८
वेबसाइट- http://www.nibmindia.org
ईमेल- pgpbf@nibmindia.org
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A successful career path for life