देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारावर नाव कोरणारे डॉ. अमोल दिघे आणि डॉ. एकनाथ घाटे यांना लोकसत्ता आयडिया एक्स्चेंजमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी विज्ञानातील भारतीय प्रगती, विज्ञानाबद्दलचे समज-गैरसमज, हिग्ज बोसॉनच्या शोधाची कथा अशा विविध गोष्टींचा उलगडा करण्यात आला. तब्बल दीड तास रंगलेल्या या चर्चेचा सारांश..
देव, श्रद्धा आणि विज्ञान
विज्ञान, देव आणि श्रद्धा वेगळे आहेत असे म्हटले जाते. पण याबाबत सांगायचे झाले तर माणसाचे मन खूप कठोर होऊ शकते. आपण आपल्या मनातील विचारांचे विभाग करू शकतो. म्हणजे जेव्हा मी विज्ञान करेन तेव्हा मी विज्ञानावर श्रद्धा करेन. जेव्हा मी देवासमोर हात जोडेन तेव्हा मी सश्रद्ध असेन. या दोन्हीमध्ये श्रद्धा हा समान धागा आहे. यामुळे जरी देव नसला तरी श्रद्धा खरी असू शकते. म्हणून विज्ञान आणि श्रद्धा यात कोणता दुजाभाव आहे असे म्हणता येत नाही. या दोन्ही गोष्टी कुठे तरी जुळतात. विज्ञानाचे वैशिष्टय़ म्हणजे विज्ञानात घाई-गडबडीने आपली मते मांडायची नसतात. त्याचा पूर्ण अभ्यास करून विचारपूर्वक मत मांडायचे असते. याबरोबर विज्ञानात तात्कालिक मतालाही खूप महत्त्व आहे. आता तुमच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे हे पाहून तुम्ही मत नोंदवू शकतात. पण नंतर जर निरीक्षणात अधिक प्रभावीपणे काही आढळले तर आपले मत बदलूही शकते. रामानुजन यांनाही देवीने दृष्टान्त दिला आणि त्यात सूत्र सापडल्याची कथा आहे. यामुळे विज्ञान आणि देव यांचा संबंध नसला तरी विज्ञान आणि श्रद्धा यांचा संबंध नक्कीच आहे.
शोध हिग्ज बोसॉनचा
हिग्जचा शोध घेण्यासाठी सर्वात मोठी आवश्यकता होती ती ऊर्जा निर्माण करण्याची. यासाठी एक भलामोठा कोलायडर तयार करणे गरजेचे होते. या कोलायडरमध्येही दोन गोष्टी एकमेकांवर आदळताना त्यात एक मीमीचाही फरक पडला असता तरी प्रयोग यशस्वी होणे कठीण झाले असते.
मूलकणांचा शोध कशासाठी?
मूलकण शोधून नेमके काय साध्य होते याबाबत अनेकदा बोलले जाते. मूलकणांच्या शोधामुळे आपण अधिक समृद्ध आणि प्रगत होत जातो. सध्या जगभरात विविध मूलकणांवर अभ्यास सुरू आहे. यामध्ये न्यूट्रिगो या मूलकणाचाही समावेश आहे. या मूलकणामुळे आपल्याला छुप्या अणुभट्टय़ा आणि तेलाचे साठे शोधण्यास मदत होणार आहे.
सर्नचे वैशिष्टय़
सर्व मोठय़ा शोधांचे मूळ हे सर्नच का, हा एक प्रश्न अनेकदा सर्वाना पडत असतो. चांगले विचार करणारे अनेक जण एकत्र आले तर त्यातून चांगल्याची निर्मिती होऊ शकते. असे आपण म्हणतो. अशाच विचाराने सर्नचा जन्म झाला. अनेक शोध असे आहेत की ते पूर्ण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर साधनसामग्री लागते. याचबरोबर पैसाही लागतो. या सर्व पाश्र्वभूमीवर युरोपीय देशांनी एकत्रित येऊन सर्न या प्रयोगशाळेची स्थापना केली. ही प्रयोगशाळा मोठय़ा परिसरात विखुरलेली आहे. येथे हजारो वैज्ञानिक काम करत असतात. यात अभियांत्रिकीशी संबंधित विविध विभाग आहेत. खालच्या बाजूस प्रयोग सुरू असतात, तर वर एक सुंदर असा कॅफेटेरिया आहे.
भारत हा सध्या निरीक्षक सभासद आहे. पण भारताने आजपर्यंत सर्नच्या विविध प्रयोगांमध्ये घेतलेल्या सहभागामुळे सर्न भारताने सहयोगी सभासद व्हावे अशी विनंती करू लागला आहे. सध्याच्या प्रयोगात १०० भारतीय वैज्ञानिक काम करत आहेत. त्यांचा यामध्ये थेट सहभाग आहे.
भारताची वैज्ञानिक प्रगती आणि मानसिकता
देशाच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल अनेकदा ओरड होत असते. देशाची लोकसंख्या वैगरे पाहता भारताने विज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे असे आपण म्हणू शकत नाही. पण ही कामगिरी गेली तीन दशके मागे वळून पाहिले तर खरोखच चांगली आहे. भारताने अनेक जागतिक प्रयोगांमध्ये विविध स्तरावर सहभाग घेतला आहे.
गणिताला नोबेल नाही
गणिताला नोबेल पारितोषिक दिले जात नाही. पण त्याला पर्याय असलेली अनेक पारितोषिके देण्यात येतात.
क्रमांक सिद्धांताची गंमत
गणित हा एक किचकट विषय आहे अशी बहुतेकांची समजूत असते. शाळा-कॉलेजांमध्ये शिकवले जाणारे, अभियांत्रिकी वा वाणिज्य शाखेत वापरले जाणारे गणित हे बहुधा एक प्रश्न सोडवण्याची पद्धत म्हणून वापरले जाते.
वैज्ञानिक आणि कला
वैज्ञानिक आणि कला यांचा फारसा संबंध नसतो असे अनेकदा बोलले जाते. पण ते चुकीचे आहे. गणिताचा अभ्यास करणे हीदेखील एक कला आहे. ही आकडय़ांची कला आहे. यामध्ये रममाण होण्यास गणितज्ञांना आवडत असते. गणित आणि संगीत याचे एक अतूट नाते असून हे नाते खूप मोलाचे आहे. कला हा माणसाचा स्थायीभाव आहे.
डॉ. अमोल दिघे
डॉ. एकनाथ घाटे
अभ्यासक्रमाव्यतिरिक्तचा अभ्यासक्रम स्वत:हून मागून घेतला आणि तो यशस्वीपणे पूर्णही केला. त्यांनी पदवी पेनसिलव्हेनिया विद्यापीठातून पूर्ण केली व आजूबाजूचे भारतीय विद्यार्थी जेव्हा बिझनेस स्कूलमध्ये जात होते तेव्हा त्यांनी गणिताची कास धरली. आपली आवड त्यांनी संधीत बदलली आणि आज या क्षेत्रात यशस्वी होऊन त्यांनी अनेक सन्मान स्वत:च्या नावावर केले आहेत. तरुण विद्यार्थ्यांची मूलभूत गणिताशी ओळख करून देऊन त्यांना यातील संशोधनासाठी प्रेरणा देण्याचे काम ते आजही करत असतात.
या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.