परिवहन विभागाकडे महसुलाचे सोने ; सुमारे दोन हजार वाहनांची नोंद, पावणेआठ कोटींचा महसूल | Customers bought vehicles on Dasara day amy 95 | Loksatta

परिवहन विभागाकडे महसुलाचे सोने ; सुमारे दोन हजार वाहनांची नोंद, पावणेआठ कोटींचा महसूल

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे.

परिवहन विभागाकडे महसुलाचे सोने ; सुमारे दोन हजार वाहनांची नोंद, पावणेआठ कोटींचा महसूल
( संग्रहित छायचित्र )

वसई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. यंदा वसईत दसऱ्यानिमित्ताने सुमारे दोन हजार नवीन वाहनांची नोंद परिवहन विभागात करण्यात आली आहे. यातून पावणेआठ कोटींचा महसूल परिवहन विभागाला प्राप्त झाला आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा त्यातील एक महत्त्वाचा मुहूर्त. यानिमित्ताने विविध नवीन वस्तू आणि वाहने खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो. करोनाकाळातील दोन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा वाहनखरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ग्राहकांनी काही दिवस आधीपासूनच वाहन विक्रीच्या दुकानात चौकशी सुरू केली होती. आगाऊ नोंदणीही केली होती.

वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये १ हजार ८९५ इतक्या नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात मालवाहतूक करणारी ३५ वाहने, ४४५ चारचाकी वाहने, ६८ ऑटोरिक्षा, १ हजार ३४७ दुचाकी वाहने आदींचा समावेश आहे. या नोंदणीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला ७ कोटी ७५ लाख २४ हजार ४८६ रुपये इतका महसूल मिळाला आहे. साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे यांनी ही माहिती दिली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या महसुलात ७० ते ७५ लाखांची वाढ झाली आहे.

वाहनांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ
वाहनांच्या किमतीही वाढल्या आहेत. यंदा वाहनांच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र वाहन खरेदीसाठीचा यंदाचा प्रतिसाद गेल्या वर्षीपेक्षा चांगला आहे, असे वाहन विक्रेत्यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागरिकांना ऑनलाइन दाखले, प्रमाणपत्रे जतन करण्याची सोय ; वसई विरार महापालिकेतही डीजी लॉकर

संबंधित बातम्या

शहरबात : फेरीवाल्यांना ‘अधिकृत’ करणारी योजना
वादाच्या भोवऱ्यात ‘हिंदी भाषिक भवना’चे भूमिपूजन संपन्न; विरोध करणारे मराठी एकीकरण समितीचे १२ कार्यकर्ते ताब्यात
वसई: श्रध्दा वालकर प्रकरण लव्ह जिहाद नाही, पण लव्ह जिहाद कायदा करावा; चित्रा वाघ यांची मागणी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली
“…तेव्हा नाही का वाटली लाज?”; उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी चक्क सादर केली कविता
सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्…; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली…
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!