वसई: नालासोपाऱ्यात रविवारी पहाटे एका घराला लागलेली आग विझवताना वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन जवान होरपळले. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालासोपारा पूर्वच्या पंचम पॅलेस इमारतीच्या बी विंगमधील २०१ या घरात रविवार पहाटे आग लागली. या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्याचे काम सुरू असताना घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये राहुल पाटील व कुणाल तामोरे हे कर्मचारी होरपळून जखमी झाले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firefighters early sunday morning in nalasopara fire cylinder blast ysh