four arrested including principal in bribery case for admission zws 70 | Loksatta

प्रवेशासाठी लाचप्रकरणी प्राचार्यासह चौघांना अटक

महाविद्यालयात प्रवेश आणि परवानगी मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य रुपाली गुप्ते (५०) यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली.

प्रवेशासाठी लाचप्रकरणी प्राचार्यासह चौघांना अटक
प्रतिनिधिक छायाचित्र

वसई : महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाच मागितल्याप्रकरम्णी मीरा रोड येथील के.एल.तिवारी आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या रुपाली गुप्ते, तसेच मुंबईच्या तंत्रशिक्षण विभागाचे साहाय्यक संचालक जितेंद्र निखाडे यांच्यासह चौघांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

तक्रारदार यांची मुलगी आर्किटेक्टचे शिक्षण घेत असून ती शिकत असलेली शैक्षणिक संस्था बंद झाली होती. त्यामुळे तिला के. एल. तिवारी आर्किटेक्चर महाविद्यालयात प्रवेश हवा होता. यासाठी मुंबईच्या तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांची परवानगी आवश्यक होती. महाविद्यालयात प्रवेश आणि परवानगी मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य रुपाली गुप्ते (५०) यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम कार्यालयीन अधीक्षक संतोष हुबाले  (४५) यांना देण्यासाठी सांगितली. हुबाले यांच्या सांगण्यावरून  मागणीतील १५ हजार रुपयांची  रक्कम कार्यालातील वरिष्ठ लिपिक श्रेया बने यांनी स्वीकारली. ती रक्कम स्वीकारताना बने यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. चौकशीत मुंबईच्या तंत्रशिक्षण विभागाचे साहाय्यक संचालक जितेंद्र निखाडे (५४) यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन् झाली. त्यामुळे पोलिसांनी प्राचार्या गुप्ते, सहाय्यक संचालक निखाडे तसेच अधीक्षक हुबाले यांनाही अटक केली.

१४ विद्यार्थ्यांच्या तक्रारी

आरोपींनी अशाप्रकारे १४ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्याप्रमाणे दहा विद्यार्थ्यांकडून जमा केलेली सव्वा तीन लाख रुपयांची रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जमा केली आहे. 

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
तीनशे वर्षांहून जुन्या धारावी देवी मंदिरात नवरात्रीचा उत्साह ; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

संबंधित बातम्या

वसईत पुन्हा दरड कोसळली , सातीवली कोंडा पाडा येथील घटना ; सुदैवाने जीवितहानी नाही
महापालिकेत केवळ दोन साहाय्यक आयुक्त

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video : मेहंदी रंगली गं…!! वधूचा फोटो ते सप्तपदी, अक्षया देवधरच्या सुरेख मेहंदीचा व्हिडीओ समोर
मंगलप्रभात लोढा यांच्या शिवराय-एकनाथ शिंदेंवरील विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक, म्हणाले, “मूग गिळून…”
Gujarat Election: “अजुनही वेळ आहे” म्हणत रवींद्र जडेजानं शेअर केला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना VIDEO
विश्लेषण: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चर्चेत का?
फिफा विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडू पेले रुग्णालयात दाखल; ब्राझीलचा स्टार कॅन्सरशी देत आहे झुंज