वसई : कचरा संकलनासाठी महापालिका कोटय़वधी रुपये खर्च करत आहे. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने कचऱ्यातून निघणारे प्लास्टिक बेकायदेशीरपणे परस्पर विकले जात असल्याचे उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई, विरार शहरात दिवसाला ७५० मॅट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा संकलित करण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय नऊ ठेकेदारांची नेमणूक केली आहे. सार्वजनिक ठिकाणे साफसफाईची कामे आणि शहरात जमा होणारा कचरा जमा करून संकलित करून कचराभूमीत टाकला जातो. या कामासाठी पालिकेने २० प्रभाग तयार केले आहेत. त्यासाठी  ३ हजार ३९७ मनुष्यबळाचा वापर केला जातो. त्यांच्या पगारावर मासिक १० कोटी रुपयांचा खर्च होतो. याशिवाय कचरा वाहून नेण्यासाठी ६७ कॉम्पॅक्टर, ११४ टीपर, ४८ डम्परवर आणि २० ट्रॅक्टर वापरले जातात. या वाहनांसाठी महिन्याला सव्वातीन कोटी रुपयांचे इंधन वापरले जाते. परंतु एवढा खर्च करूनही पालिकेला कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प सुरू करता आला नाही. त्यामुळे शहरातून निघणाऱ्या कचऱ्यातील प्लास्टिकची बेकायदा विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal sale of plastics from garbage in vasai zws
First published on: 02-12-2022 at 03:14 IST