वसई: नालासोपारा पश्चिमेच्या खंबाळेश्वर मंदिर जवळील चौधरीवाडी इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. यातून तीन जणांची सुखरूप सुटका केली आहे तर एक जण जखमी झाला आहे. नालासोपारा पश्चिमेच्या भागात खंबाळेश्वर मंदिर जवळील चौधरीवाडी येथे दोन मजली इमारत आहेत. शनिवारी रात्री अचानकपणे या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

हेही वाचा : वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nala sopara gallery slab collapse three rescued by fire brigade one injured css
First published on: 21-04-2024 at 12:22 IST