लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : व्यावसायिकाडून १० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याच्यासहीत ४ जणांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मास्टरमाईंड वेगळाच असल्याचा आरोप तक्रारदार व्यावसायिकाने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींना आणखी ५ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता (३४) यांचा वरळीत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी स्वप्नील बांदेकर यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण मिटविण्यासाठी बांदेकर यांनी १० कोटींची खंडणी मागितली होती. नंतर तडजोड होऊन खंडणीची रक्कम दिड कोटी रुपये ठरली. त्या खंडणीच्या रकमेतील १५ लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकरच्या वतीने हिमांशू शहा (४५) आला होता. शनिवारी रात्री मिरा रोड येथील येथील बनाना लिफ हॉटेल मध्ये नवघर पोलिसांनी सापळा लावून शहा याला अटक केली. त्यानंतर नालासोपारा येथून माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर तसेच त्याचे अन्य दोन साथीदार किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांना अटक केली.

सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे. मात्र या प्रकरणात हे फक्त मोहरे असून खरा मास्टरमाईंड वेगळा असल्याचा आरोप तक्रारदार आकाश गुप्ता यांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तपास करून चौघा आरोपींना अटक केली. मात्र यापुढे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मुख्य सुत्रधाराला अटक करावी अशी मागणी त्यांनी केला.

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

आरोपींची पोलीस कोठडी बुधवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने ती मंजूर करून ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता हे आरोपी १० फेब्रुवारी पर्यंत नवघर पोलिसांच्या कोठडीत असतील. या चौकशीतून या प्रकऱणातील सत्य समोर येणार असल्याची शक्यता आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twist in rs 10 crore extortion case in vasai allegations that real mastermind is different mrj