राज्याच्या उपराजधानीत विविध कंपन्यांच्या ‘पॉन्झी’ योजनांमध्ये हजारो नागपूरकरांनी त्यांची आयुष्याची जमा पुंजी गमाविली. लोकांना फसविणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांवर कारवाई झाली, ते कारागृहातही गेले, पण गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी मात्र परत मिळाल्या नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच वर्षांत पाच मोठय़ा पॉन्झी योजनांतून झालेली फसवणूक 

१) वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लि.- ३० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून ५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे सुमारे १,५०० कोटी रुपये गोळा केले व ते परत केले नाही. २७ जुलै २०१५ ला हा घोटाळा उघडकीस आला. संचालकांना अटक करण्यात आली

२) महादेव लँड डेव्हलपर्स- अडीच वर्षांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून ४ हजार लोकांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक. गुंतवणूकदारांच्या रकमेतून मिहान परिसरात जमीन खरेदी करून त्यातील लाभ ठेवीदारांना देण्याचे आश्वासन. प्रत्यक्षात इतर ठिकाणी खरेदी. २०११ मध्ये प्रकरण उघडकीस.

३) जे.एस. फायनान्स अँड सेव्हिंग्स- महिन्याला ६ टक्के व्याजाचे आमिष दाखवून ५०० लोकांची कोटय़वधी रुपयांनी फसवणूक. २०१२ मध्ये घोटाळा उघडकीस.

४) रविराज ग्रुप- मासिक ३ ते ३.२२ टक्के, तर त्रमासिक १० टक्के व्याजाने २४ महिने मुदत ठेव योजना, ६० महिन्यांत साडेपाचपट देण्याचे आमिष. ६०० ठेवीदारांनी पैसे गुंतविले. सुमारे १५० कोटी कंपनीने व्यवसायवाढीसाठी तसेच मालमत्ता खरेदीसाठी वापरले. २०१४ मध्ये घोटाळा उघडीस. संचालकाला अटक.

५) अलीना एम्प्लॉयमेन्ट र्सिोस- ‘घरबसल्या हजारो रुपये कमवा’ योजना. १० ते १५ हजार रुपये नोंदणी शुल्क घेऊन ते दुपटीने परत देण्याची योजना. ५ हजार ठेवीदारांची ५०० कोटी रुपयांनी फसवणूक. डिसेंबर २०१५ मध्ये घोटाळा उघडकीस. संचालकांना अटक.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five largest fraud in ponzi schemes