‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचा ६६वा वर्धापनदिन बुधवार, १५ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास नाटय़, चित्रपट, कला, साहित्य, क्रीडा, शिक्षण, पोलीस, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. नरिमन पॉइंट येथील ‘एक्स्प्रेस टॉवर्स’च्या हिरवळीवर झालेल्या या शानदार कार्यक्रमाची ही चित्रमय झलक..
*नाते प्रेमाचे.. कॉँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये भलेही कुरघोडीचे राजकारण चालत असेल, मात्र  ‘लोकसत्ता’ च्या वर्धापनदिनाच्या सोहळय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना प्रेमाने केक खाऊ घातला.  या खेळकर क्षणाचे साक्षीदार होते गृहराज्यमंत्री सतेज पाटील,  आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक.
*अभिनेत्री, गायिका आणि लेखिका अमृता सुभाष ही घरचाच कार्यक्रम असल्यासारखी  वावरली.*भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार  अजित वाडेकर यांनी परिसंवादातील विचार काळजीपूर्वक  ऐकले.*मुंबईचे महापौर सुनील प्रभू, अतिरिक्त पालिका आयुक्त श्रीनिवास आणि आयसीटीसीचे कुलगुरू डॉ. गणपती यादव.*मराठी रंगभूमीवरील अभ्यासू दिग्दर्शक विजय केंकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे एकत्र आल्यानंतर या कलावंतांमध्ये खूप वेळ चर्चा रंगली.*शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे*मराठी चित्रपट आणि चित्रकला क्षेत्रातील दोन मान्यवर.. रामदास फुटाणे आणि वासुदेव कामत*अभिनेत्री विनी परांजपे*अगदी सुरुवातीपासून सोहळ्याला हजर असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधला.*मुंबईचे जिल्हाधिकारी  चंद्रशेखर ओक*भारताचे माजी कसोटीपटू आणि प्रशासक दिलीप वेंगसरकर*राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी हे एक्स्प्रेस वृत्त समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस यांच्याशी गप्पा मारताना रंगून गेले होते. त्यांच्याकडे कुतूहलाने पाहताना जयराज साळगावकर.*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे*जागतिक कीर्तीचे बुद्धीबळपटू व भारताचे माजी ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री.*नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव    के. पी. बक्षी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया.*नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत  हे मंत्रिपदाची झूल उतरवून कार्यक्रमात सहभागी झाले होते.